बारावीत सर्व विषयांत भोपळा, तरीदेखील ‘एमपीएससी’ त पहिल्याच प्रयत्नात पास
1 min read
धुळे दि.७:- बारावीत सर्व विषयांत नापास झाल्यानंतरही जिद्द, आत्मविश्वासाच्या बळावर ‘एमपीएससी’ सारख्या परीक्षेतही यश मिळविता येते, हे कठीण काम धुळ्याच्या तुषार संदीप घुगरे (धुळे) या तरुणाने सिद्ध करून दाखविले आहे.
बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देणारी असते. या परीक्षेत अपयश आले, कमी गुण मिळाले तर काही जण टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करतात. बारावीत तो वाणिज्य शाखेच्या सर्व विषयांत नापास झाला.
मात्र नापास झाल्याने घरातील वडीलधारी मंडळी त्याला थोडी रागावली. हा राग त्याने मनावर घेतला. नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्याची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात त्याने या यशाला घातलेली आहे.
“अपयशाने खचून न जाता जिद्द, आत्मविश्वास ठेवल्यास कुठल्याही परीक्षेत यश मिळते. स्पर्धा परीक्षेत अभ्यासाचे नियोजन महत्त्वाचे आहे.”
– तुषार घुगरे, पोलिस उपनिरीक्षक
मल्लखांबमध्ये मिळविले सुवर्णपदक
तुषार घुगरे हा मल्लखांब खेळाडू आहे. पटियाला (पंजाब) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने सुवर्णपदक, तर ग्वाल्हेर येथे झालेल्या विद्यापीठस्तरीय स्पर्धेत त्याने कांस्यपदक मिळविलेले आहे.