खासदार डॉ.अमोल कोल्हेंचा अजित पवार यांना धक्का! “सगळं विसरायचं पण बाप नाही”…..

1 min read

मुंबई दि.३ :- काल राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्याला डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते. आता त्यांनी अजित पवारांनाच मोठा धक्का दिला आहे. त्यांनी मी पवार साहेबांसोबतच म्हणत ट्विट केलं आहे. साहेब सांगतील ते धोरण आणि साहेब बांधतील ते धोरण. सगळं विसरायचं पण बाप नाही विसरायचा. त्याला नाही विसरायचं असं म्हणत डॉ.अमोल कोल्हेंनी ट्विट केलं.

जेव्हा बुद्धी आणि अंतःकरणात द्वंद्व होतं तेव्हा आपल्या मनाचं ऐका. कदाचित बुद्धी कधी कधी नैतिकता विसरते पण मन कधीच विसरत नाही असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. त्यांच्या या ट्विटची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.राष्ट्रवादीमुळे महाविकास आघाडीतून शिंदे गट बाहेर पडला असा दावा केला जात असताना आता राष्ट्रवादीचे 9 आमदारच फडणवीस आणि शिंदे गटासोबत गेले आहेत. रविवारी राजभवनात 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली.

यानंतर राज्यभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते यांच्यात फूट पडली आहे. याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर डॉ. अमोल कोल्हे यांचं ट्विट सध्या चर्चेत आलं आहे. त्यांनी भावुक ट्विट करत कॅप्शन दिलं आणि मी साहेबांसोबतच असंही त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला सांगितलं आहे. दुसरीकडे अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीला राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके हे देखील उपस्थित होते. मात्र आज हे तीनही आमदार शरद पवार यांच्यासोबत दिसून येत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे