कोळवाडीच्या सरपंच ललिता पारवे यांना ‘आदर्श सरपंच पुरस्कार’

1 min read

आळे दि.१०:- राज्यस्तरीय सरपंच सेवा संघ 2025 आदर्श सरपंच पुरस्कार कोळवाडी (ता.जुन्नर) गावच्या युवा सरपंच ललिता पारवे यांना प्रदान करण्यात आला. चार वर्षे ग्रामपंचायत सदस्य, समाजातील विविध घटकांसोबत सुसंवाद, विविध विकास कामे, स्वच्छ व पारदर्शक कारभार, ग्रामपंचायत मधील विविध अभिलेखे पडताळणी व त्याबाबतीत शिस्तबद्ध कारभार अशा विविध कामातून पारवे यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, भाऊ कुऱ्हाडे,अजित सहाणे मित्र परिवार, सर्व कोळवाडी ग्रामस्थ बंधू-भगिनी यांच्याकडून सरपंच पारवे यांचे अभिनंदन करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!