कल्याण – अहिल्यानगर महामार्गावर साईट पट्ट्या न भरल्याने अपघात वाढले

1 min read

Oplus_16908288

बेल्हे दि.७:- कल्याण – अहिल्यानगर महामार्गावर गुंजाळवाडी (ता.जुन्नर) येथे रस्त्याच्या साईट पट्ट्या व्यवस्थित न भरल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. कल्याण – अहिल्यानगर महामार्गाच्या सिमेंट काँक्रिट चे काम संत गतीने सुरू असून या

महामार्गावरील दोन्ही बाजूच्या साईट पट्ट्या चांगल्या प्रमाणात न भरल्याने तिथे वारंवार अपघात होत आहेत. तसेच साईट पट्ट्या जवळ रस्त्यावर माती असल्याने मोटारसायकल स्लीप होऊन अपघात होत आहेत. या महामार्गाच्या सिमेंट काँक्रीटचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे.

संत गतीने काम सुरू असल्याने राजुरी स्टँड, गुंजाळवाडी, बेल्हे या ठिकाणी अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. रस्त्याच्या साईट पट्ट्या पूर्ण भराव्यात अशी मागणी गावच्या सरपंच नयना गुंजाळ, सामाजिक कार्यकर्ते रामा गुंजाळ, भागचंद बोरचटे, भाऊसाहेब गुंजाळ, आनंद गुंजाळ, दत्तात्रय गुंजाळ तसेच स्थानिक ग्रामस्थानी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!