जुन्नर तालुक्यात दिवसा बंद घरे फोडणारे सराईत जेरबंद

1 min read

आळेफाटा दि.६:- जुन्नर तालुक्याच्या पुर्व भागातील गावांमध्ये दिवसा बंद घरे फोडणारे सराईत चोरटयांस जेरबंद करण्यास आळेफाटा पोलीसांना यश आले आहे.याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार राजुरी (ता. जुन्नर) येथील पुनम अमित हांडे या दि. १२ डिसेंबर २५ रोजी घर बंद करून कामानिमित्ताने बाहेर गेल्या असता चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत बंद घराचा दरवाजाचे लावलेले कुलूप तोडुन घरात प्रवेश करत कपाटातील सोन्याची नथ, कानातले, पायातले चांदीचे पैजन जोड असा एकुण ५० हजार रूपयांचा ऐवज चोरीला गेल्याचा हांडे यांनी गुन्हा नोंदविण्यात आला होता.सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने पोलिस निरीक्षक जाधव यांनी तपास चालू केला. घटनास्थळावरील तसेच घटनास्थळावर येणाऱ्या प्रत्येक मार्गावरील सी.सी.टी.व्ही फुटेज चेक केले तसेच त्यांनागोपनिय बातमीदारामार्फत माहीती मिळवत यातील अज्ञात आरोपींचा माग काढत आरोपी १) अमोल धर्मा इगवे वय ३१ वर्षे रा. बोधेगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर २) विकास सुनिल घोडके वय २९ वर्षे रा. विदयानगर, मिरीरोड शेवगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर यास ताब्यात घेवून त्यांच्याकडे सखोल तपास केला असता ते रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर पुणे शहर, पिंपरी चिंचवड, लातूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्हामध्ये विविध गुन्हे दाखल असून ते सराईत गुन्हेगार आहेत. नमुद आरोपींनी आळेफाटा चोरी केल्याचे कबूल केले.सदर आरोपींकडून ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, नाकातील ३ नथ, पायातील पैजणचे चांदीचे ३ जोड, चांदीचा कंबरेचा छल्ला तसेच गुन्हयात वापरलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मॉडेल असलेली मोटार सायकल क्रमांक एम.एच.२३ बी.जे.७९९३ असा एकुण ४ लाख १५ हजार रुपये किंमतीचा मु‌द्देमाल गुन्ह्याचे तपासकामी जप्त करण्यात आला आहे.सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, विभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिलेल्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक सतिश टाव्हरे, पो. हवा. विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित माळुंजे, पो.कॉ नविन अरगडे, ओंकार खुणे, गणेश जगताप, सखाराम जुबड यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!