बलराम दूध संस्थेच्या चेअरमन पदी माऊली संभेराव यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड
1 min read
बेल्हे दि.४:- बलराम सहकारी दूध संस्था आणे (ता. जुन्नर) च्या चेअरमन पदी माऊली संभेराव, व्हाईस चेअरमन पदी बाळू दाते तर सचिव पदी नवनाथ दाते यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली. या वेळी संचालक शरद दाते, मनसुख दाते, रंगनाथ दाते, राहुल आहेर, उज्वला आहेर,
संचालिका अलका दाते, दूध संकलन अशोक देशमुख, कॉम्पुटर ऑपरेटर शोएब पठाण यांस गवळी बांधव उपस्थित होते.गावच्या सरपंच प्रियंका दाते यांनी तसेच सर्व सभासदांच्या वतीने सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.बलराम दूध संस्था ही आणे येथील सर्वात मोठी दूध संस्था असून
दिवसाला २७०० ते २८०० लिटर दूध संकलन येथे होत असते. पुणे जिल्हा सहकारी दूध संस्था संघ मर्यादित कात्रज डेअरी च्या वतीने २०२२-२३ चा दिला जाणारा आदर्श दूध संस्था पुरस्कार बलराम सहकारी दूध संस्थेला मिळाला होता.
