इंदिरानगर शाळेत भरला आनंदी बाजार व खाऊगल्ली महोत्सव
1 min read
बेल्हे दि.४:- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती तथा बालिका दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरा नगर बेल्हे (ता.जुन्नर) येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी घेतला भाजीपाला व खाद्यपदार्थ खरेदी – विक्री करण्याचा अनुभव घेतला. परिसरातील पालक वर्ग,ग्रामस्थ यांनी उत्तम असा प्रतिसाद दिला.
यावेळी जानकू डावखर, डी.बी.नाना वाळुंज, तुषार डावखर, राजेंद्र पिंगट, नारायण पवार, दादाभाऊ मुलमुले,अल्पेश सोनवणे,रितेश देशमुख,गणेश पिंगट,किसन देशमुख,शरद भंडलकर,स्वप्निल खोल्लम,कोमल पिंगट, संतोष रोकडे, अशोक बांगर,महादू कुरकुटे,जुबेर शेख,राजू घोलप, नंदा खोमणे, मेजर सचिन पिंगट, हिना शेख,
निलेश सोनवणे यांची उपस्थिती लाभली. सदर कार्यक्रमाचे नियोजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अल्पेश सोनवणे व सर्व सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक अनिल कुटे सुरेखा कुटे, अंगणवाडी सेविका कांता पिंगट व मदतनीस पिंगट यांनी केले.
