सर्व शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला यश
1 min read
जुन्नर दि.४:- जुन्नर तालुका कृषी कार्यालय आगर येथे दि.२/१/२०२६ रोजी शेतकऱ्यांना जुन्नर तालुक्यामध्ये युरिया व महाधन २४:२४:०० ही खते उपलब्ध करून द्यावी तसेच व्हाईट फ्लॅश या फ्लावरच्या कंपनीने निकृष्ट दर्जाचे बियाणे वाटप केले आहे त्या कंपनीवर बंदी आणावी. तालुक्यामध्ये 53 रुपये प्रति किलो प्रमाणे सोयाबीन खरेदी करावी.
शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये यासाठी योगेश तोडकर अध्यक्ष शेतकरी सेना मनसे पुणे, प्रमोद खांडगे पाटील प्रतिनिधी स्वाभिमानी शेतकरी संघटना जुन्नर, सचिन थोरवे युवा अध्यक्ष शेतकरी संघटना जुन्नर यांनी सुरू केले होते. दोन दिवसानंतर गणेश भोसले तालुका कृषी अधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांना विनंती केली
की दोन दिवसांमध्ये ६०० मे.टन युरिया तसेच तुटवडा असलेले महाधन २४:२४:०० देखते उपलब्ध करून देऊ. सोयाबीन खरेदी बाबत शासनामार्फत खरेदी करण्यासंदर्भात सदर संघटनेची मागणी आहे.सदर विषय हा पणन विभागाशी संबंधित आहे सोयाबीन संकलन केंद्र कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर नारायणगाव येथे सुरू आहे.
तसेच विनयशील फार्मर प्रोड्युसर कंपनी राजुरी यांच्या मार्फत ५३०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे खरेदी सुरू आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक होणार नाही सोयाबीन खरेदी सुरळीत रित्या सुरू ठेवू याबाबत काही प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित विभाग दक्षता घेईल असे लेखी पत्र संघटना प्रतिनिधींना दिले.
सदरचे उपोषण सोडतेवेळी मकरंद पाटे जिल्हाध्यक्ष मनसे, राजेंद्र ढोमसे शिवनेरी शेतकरी संघटना अध्यक्ष, अनिल गावडे सकल मराठा समाज समन्वयक पुणे, रितेश दळवी मनसे शहर प्रमुख नारायणगाव,सुशांत दिवटे मनसे प्रतिनिधी नारायणगाव, सुरज शिंदे, वैभव भास्कर सदस्य ग्रामपंचायत आगर, सत्यवान भास्कर आदी उपस्थित होते.
