राजुरी सोसायटीला ‘सहकारी उत्कृष्टता पुरस्कार’
1 min read
राजुरी दि.३१:- राष्ट्रीय सहकारी विकास निगम नवी दिल्ली प्रादेशिक क्षेत्रीय कार्यालय पुणे यांचे वतीने राजुरी विवीध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. राजुरी ता. जुन्नर जिल्हा पुणे ला राज्यस्तरीय केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या उपक्रमाचा स्विकार करणार्या प्राथमिक सहकारी संस्था या श्रेणीत प्रथम क्रमांकाचे ‘सहकारी उत्कृष्टता पुरस्कार ‘2025’ ने सन्मानित करण्यात आले आहे.
पुरस्काराचे स्वरूप 35000/ व सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे राष्ट्रीय सहकारी विकास निगम चे मुख्य संचालक गिरीराज अग्निहोत्री पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संजय काळे

जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती व संस्थेचे जेष्ठ संचालक दिपक आवटे, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देसाई, गिरीश जाधव, Ncdc चे कडलाक, पारुल सिंग राजुरी सोसायटी चे मा. चेअरमन, कारभारी मारुती औटी व्हा. चेअरमन, अविनाश पाटील औटी.
संचालक वल्लभ शेळके, लक्ष्मण घंगाळे, लक्ष्मण फावडे, कुंडलीक मारुती हाडवळे, संजय औटी, उमेश औटी, दस्तगीर पठाण, कारभारी गंधट, अलका हाडवळे, सुमन कणसे सर्व संचालक, सचिव संतोष वाईकर व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

