श्री सिद्धिविनायक पब्लिक स्कुलच्या दिंडीने वातावरण भक्तिमय

शिक्रापूर दि.२९ – आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून लाखो भाविक दिंडी घेऊन पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. सिद्धिविनायक स्कुल (शिक्रापूर) च्या विद्यार्थ्यांनी देखील या शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेनुसार दिंडी संस्कृतीचा अनुभव घेतला. सर्वप्रथम सकाळी पूर्व प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांनी शाळा मैदानात टाळ,वीणा,पखवाजाच्या गजरात पालखीचे पूजन केले.मुलांनी वारकरी वेशात भजनात सहभाग घेतला व फुगडी खेळून आनंद घेतला. प्राथमिक व उच्च माध्यमिक वर्गांनी विविध गुणदर्शन पर कार्यक्रमांनी दिंडीची शोभा वाढवली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संत गोरा कुंभार नाटिकेने सर्वांची वाहवा मिळविली. विद्यार्थ्यांनी विविध भजने सादर केली.
या वर्षी वृंदावन पार्क येथे दिंडी सोहळा नेण्यात आला होता.सर्व वृंदावन पार्क,साईसिद्धी कॉलनी व परिसरातील रहिवासी यांनी विविध रांगोळ्या काढून दिंडीचे स्वागत केले व विद्यार्थ्यांसाठी फराळ आदींचे नियोजन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे संस्थापक सोमनाथ सायकर, चेअरमन मनीषा सायकर,विश्वस्त साकोरे सर,विश्वस्त अक्षय गायकवाड सर,विश्वस्त सपना सायकर,विश्वस्त प्रांजल गायकवाड विश्वस्त पंढरीनाथ राऊत, विश्वस्त निखिल वाव्हळ, विश्वस्त शीतल सायकर,विश्वस्त अजिंक्य गायकवाड,विश्वस्त सुरेश शिंदे,विश्वस्त महेंद्र पटेल,विश्वस्त नवनाथ वाव्हळ यांनी पालखी पूजन केले व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
प्राचार्य गौरव खुटाळ ,उपप्राचार्या उज्ज्वला दौंडकर , सहशालेय उपक्रम विभाग व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,ड्रायव्हर्स काकाआदींनी नियोजन केलेल्या या कार्यक्रमाचे फराळ वाटप करून सांगता करण्यात आली.