भाजप नेत्या आशाताई बुचके यांनी आळे येथील श्री क्षेत्र रेडा समाधी मंदिर बांधकामास ३० लाख रुपये निधी केला मंजूर
1 min read
आळे दि.२९ :- आषाढी एकादशी च्या निमित्ताने आळे (ता.जुन्नर)येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलविलेल्या रेडा समाधी मंदिर परिसरात गुरूवारी हजारो भाविकांनी दर्शन घेतले या वेळी या प्रसंगी भाजपा नेत्या आशाताई बूचके यांनी सभा मंडपासाठी ३० लक्ष रुपयांच्या निधी देण्याचे मंजुर केले असून पुढच्या आठवड्यात चेक स्वरूपात हा निधी देणार असल्याची माहिती देवस्थान कमितीचे सचिव कान्हु कुऱ्हाडे यांनी दिली.
या आधी आशाताई यांच्या माध्यमातून ३५ लाख रुपये निधी देवस्थानला मिळाला असून त्या निधीतून मंदिराचे काम झाले आहे.एकादशी च्या दिवशी पहाटे अन्नदाते संजय कु-हाडे यांच्या हस्ते पुजा करण्यात आल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.दिवसभरात हजारो भाविक भक्तांणी माऊलींचे दर्शन घेतले.
याप्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष धनंजय काळे व यात्रा कमिटचे अध्यक्ष एकनाथ कु-हाडे, पंचायत समितीचे माजी सदस्य जीवन शिंदे,संतवाडी गावचे सरपंच नवनाथ निमसे, संजय शिंदे, अविनाश कु-हाडे,म्हतुजी सहाने, व्यवस्थापक कान्हु पाटील कु-हाडे ,चारूदत्त साबळे,विलास शिरतर,अखंड हरिनाम सप्ताह कमेटीचे अध्यक्ष संतोष पाडेकर, गिरीश कोकणे, ॲड, सुर्दशन भुजबळ, संजय खंडागळे, महेंद्र गुंजाळ, बाळशिराम डावखर, गोरक्षनाथ दिघे, ज्ञानदेव सहाने, बाजीराव निमसे, प्रसन्न डोके, महेंद्र पाडेकर,माधव टकले आदी मान्यवर उपस्थित होते.