यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्रातील विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ
1 min readनिमगाव सावा दि.२९:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्रातील एम.ए. मराठी व तृतीय वर्ष कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ व माजी विद्यार्थी मेळावा महाविद्यालयात संपन्न झाला. अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या, केंद्रप्रमुख डॉ. छाया जाधव यांनी दिली.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, सचिव परेश घोडे, संचालक दत्तात्रय घोडे गुरुजी, संदीप भाऊ थोरात, संस्था प्रतिनिधी कविता पवार, महाविद्यालयातील सर्व शिक्षक, माजी विद्यार्थी उपस्थित होते. दिलीप वळसे पाटील महाविद्यालयाची सुरुवात सन 2009 मध्ये झाली आणि तदनंतर या ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थ्यांना नियमित प्रवेश घेणे शक्य नाही.
तसेच कमी शिक्षण असलेले विद्यार्थी, नोकरदार वर्ग, शेतकरी या सर्वांचा विचार करता त्यांचं पुढील शिक्षण पूर्ण होण्यासाठी संस्थेचे संस्थापक पांडुरंग पवार यांच्या दूरदृष्टीने सन 2011 मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे अभ्यास केंद्र सुरू झाले. आज या अभ्यास केंद्रामध्ये बीए, बी कॉम शाखा आणि एम ए मराठी, एम ए अर्थशास्त्र असे विषय शिकविले जातात.
अशी माहिती संस्थेचे संचालक संदीप थोरात यांनी दिली.या कार्यक्रमांमध्ये अभ्यास केंद्रातील माजी विद्यार्थी रेशमा गावडे, संभाजी ढमाले, सतीश भूतांबरे,पोपट घनकुटे, जिजाबाई साबळे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व अभ्यासकेंद्राप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. या अभ्यास केंद्रामुळे परिसरातील अनेक विद्यार्थी जे शिक्षणापासून वंचित होते ते शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आले.
या अभ्यास केंद्रामुळे नोकरदार वर्गातील लोकांना आपले पुढील शिक्षण पूर्ण करता आले. या अभ्यासकेंद्राप्रती आम्हा विद्यार्थ्यांचे ऋणानुबंध जोडले गेले. यामुळे भविष्यामध्येही महाविद्यालयाप्रती अथवा महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशा प्रकारच्या भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
याप्रसंगी प्रा. सुभाष घोडे, प्रा. ज्योती गायकवाड, माजी प्राचार्य प्रल्हाद शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नीलम गायकवाड, प्रास्ताविक केंद्र संयोजक प्रा. आशिष गाडगे आणि संस्थेच्या प्रतिनिधी कविता पवार यांनी आभार मानले.