मॉडर्न च्या विद्यार्थ्यांची आरोग्य दिंडी; विठू नामाच्या गजरात दुमदुमली बेल्हे नगरी

1 min read

बेल्हे दि.२९ :- मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज बेल्हे (ता.जुन्नर) या शाळेच्या विद्यार्थ्यांनी बेल्हे गावामध्ये आरोग्य दिंडीचे आयोजन केले होते. १ ली ते १२ वी चे विद्यार्थी या दिंडीमध्ये सहभागी झाले होते.यामध्ये विठ्ठल – रुक्मीणी, संत जनाबाई, संत नामदेव,संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, अशा विविध संतांची वेशभूषा विद्यार्थांनी केली होती.

पारंपरिक ,विना,पखवाज या वादयांच्या नादात विदयार्थी माऊली- माऊली, विठोबा-रखुमाई म्हणत होते. गावातील ग्रामस्थांनी या दिंडीचे स्वागत केले.बेल्हे बसस्थानकावर विठ्ठलाची आरती तसेच रिंगण, फुगडी झाली.प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी फड यांना चिमुकल्या मुलांनी ग्रीटिंग दिले.

तसेच च्या चिमुकल्या मुलांनी डोक्यावर तुळशी व हातात टाळ घेतला होता. काही विद्यार्थ्यांनी ही हातात टाळ ,पताका व विना घेऊन माऊली माऊली चा जयघोष विद्यार्थी करत होती. लहान चिमुकल्यांना वारकऱ्यांच्या वेशात पाहून सर्व ग्रामस्थ त्यांचं कौतुक करत होती. या दिंडीतून विद्यार्थांनी झाडे लावा, झाडे जगवा, पाणी आडवा पाणी जिरवा, प्लास्टिक पिशव्यां ऐवजी कापडी व कागदी पिशव्या वापरा, एकात्मता, महिला सबलीकरण, व्यसनमुक्ती, इंधन बचत, स्वच्छता राखा, झाडे लावा पृथ्वी वाचवा अशा विविध घोषणा देऊन समाजप्रबोधक केले.

विद्यार्थांनी समाज प्रबोधन पर घोषणा दिल्या तसेच मेघराजला बरसून बळीराजाला सुखी करण्याचं आवाहन विद्यार्थ्यांनी केलं.या प्रसंगी शाळेचे सर्व विद्यार्थी, शाळेच्या जेष्ठ मार्गदर्शिका सुमन ढवळे, संस्थेचे विश्वस्त दावला कणसे, प्राचार्या विद्या गाडगे,उपप्राचार्य के.पी.सिंग, शिक्षक, विद्यार्थी,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही सहभाग घेतला.

या वेळी संस्थेचे संस्थापक संस्थापक अध्यक्ष सीए सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे, सर्व संचालक मंडळ यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे