श्री जे. आर. गुंजाळ इंग्लिश मीडियम शाळेत अवतरली विठुरायाची पंढरी

1 min read

आळेफाटा दि.२९:- टाळ वाजे,वीणा वाजे,वाजे हरीची वीणा, माऊली निघाले पंढरपूरा…मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा!! विठ्ठल विठ्ठल नाम घोष,आकर्षक वेशभूषेतील विद्यार्थी सादरीकरण करीत आळेफाटा (ता.जुन्नर) येथील श्री.जे आर गुंजाळ इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्ताने पालखी सोहळा साजरा केला.

आळेफाटा येथील या इंग्रजी माध्यम शाळेतील पालखी सोहळ्याचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक सतिश पाटील, पर्यवेक्षक विठ्ठल म्हस्के यांच्या हस्ते व सर्व विद्यार्थी व शिक्षक यांच्या उपस्थितीत झाले. यानंतर विठ्ठल विठ्ठल व ज्ञानोबा माऊली तुकाराम असा एकच नामघोष विद्यार्थ्यांनी केला.लेझीम पथकाने यावेळी विविध प्रकार सादर केले पालखीसोबत संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

भगव्या पताका हरी नामाचा जप ज्ञानोबा माऊली तुकाराम चा गजर करत तसेच नव्या पिढीला वारकरी संप्रदायाचे महत्त्व मुख्याध्यापक सतिश पाटील यांनी समजावून सांगितले. या निमीत्ताने संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रदीप गुंजाळ, सचिव मीना गुंजाळ यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.या दिंडी सोहळ्याचे नियोजन शिक्षक विष्णू भोसले व नमिता दांगट व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे