एकुलत्या एक मुलीने दिला वडिलांना अग्नी
1 min readबेल्हे दि.२५:- बांगरवाडी (ता.जुन्नर) येथील आपल्या वडिलांना मुलींनीच अग्नीडाग दिला.गावातील आत्माराम रामभाऊ बांगर यांचा वयाच्या ५० व्या वर्षी दि.२४ रोजी हृदय विकाराने दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना मुलगा नसल्याने मुलगा व मुलगी असा भेदभाव न करता मुलींनीच अग्निडाग दिला.
समाजात शिक्षणात मुली कमी नाही मग या कामात आम्ही का मागे राहू आणि मुलीने हे केल्याने का होते? असे अनेक प्रश्न तिने उपस्थित केले. प्रिया आत्माराम बांगर अस या एकुलत्या एक मुलीचं नाव असून ती अविवाहित आहे.मुंबई येथे ती डिग्री इजिनियर या पदावर नोकरी करते.
तिचे वडील ड्रायव्हिंग करत असत तर मुलीची आई हभप कमलताई बांगर या किर्तनकार आहेत. बापाची लाडकी असल्यामुळे मीच हा विधी करणार व का करु नये? मुलीच्या हातून चालत नाही का? असे तिचे अनेक प्रश्न होते. तिलाच अग्निडाग देऊद्या अस ग्रामस्थांनी ठरवलं. अंत्यविधी दि.२४ रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान पार पडला. शेवटी तिनेच आपल्या वडिलांचे सर्व विधी केले.
मुला- मुलीत भेदभाव करु नका, त्यांना ही सन्मानाने जगु द्या व पुढे जाऊद्या असा संदेश मुलीने दिला.मुलीच्या या धाडसाचं परिसरात कौतुक होत आहे.