आळेफाट्यावर हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे उद्या हरिकीर्तन

1 min read

आळेफाटा दि.२४:- आळेफाटा (ता.जुन्नर) येथे हॉटेल ‘राजेशाही ‘ प्युअर व्हेज अँड लॉजिंग या नवीन व्यवसायाचा उद्घाटन समारंभ तसेच ‘श्री हरेश्वर हायड्रोलिक्स’ या फर्मचा नूतन वास्तूमध्ये स्थलांतर सोहळा उद्या रविवार दि. 25 रोजी संपन्न होणार आहे. या निमित्ताने समाज प्रबोधनकार हभप इंदोरीकर महाराज देशमुख यांचे सायंकाळी ४ ते ६ या वेळेत हरिकीर्तन होणार आहे. या कीर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन जाधव परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आळेफाटा येथे हॉटेल राजेशाही या नूतन व्यवसायाचा उद्घाटन सोहळा व श्री हरेश्र्वर हायड्रोलिक्स फर्मचा स्थलांतर सोहळा सायंकाळी साडेसहा वाजता संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने ४ वाजता महाराजांचे हरी किर्तन होणार आहे. त्यानंतर साडेसहा वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे. शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या शुभहस्ते तसेच जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके,पारनेर चे आमदार निलेश लंके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न होणार आहे.

तसेच जुन्नर चे माजी आमदार शरद सोनवणे, माजी जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाताई बुचके, सभापती अहमदनगर जिल्हा परिषद काशिनाथ दाते, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर बाबाजी तरटे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, कृषी व पशुसंवर्धन माजी सभापती जिल्हा परिषद अहमदनगर मधुकर उचाळे, आळेगावचे सरपंच प्रीतम काळे, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त महेंद्र पाडेकर, विविध सहकारी सोसायटी आयोजित चेअरमन मारुती पाडेकर हे ही उपस्थित असणार आहेत.

त्याचबरोबर नगर व पुणे जिल्ह्यातील सर्व मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन सोपान रंगनाथ जाधव, संपत रंगनाथ जाधव, प्रसाद शेट्टी, विठ्ठल जाधव तसेच बालाजी ग्रुप व मित्रपरिवार आळेफाटा यांनी केले आहे.

या वेळी मान्यवरांच्या शुभहस्ते राजेशाही या हॉटेलच्या ॲपचे ही लॉन्चिंग होणार आहे.या ॲपच्या माध्यमातून पाच किलोमीटरच्या अंतरावर कुठूनही आपण या हॉटेलमधून पार्सल ऑर्डर करू शकता.अशी सुविधा परिसरात पहिल्यांदाच उपलब्ध करून देण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे