जुन्नर वनविभागा अंतर्गत वनपरिक्षेत्र वनमहोत्सव व शिवजन्मभूमी वृक्ष संवर्धन अभियान अंतर्गत ५ हेक्टर क्षेत्रावर होणार वृक्ष लागवड
1 min read
मंगरूळ दि.३०:-आषाढी एकादशी दिनी मंगरूळ (ता.जुन्नर) फॉ.क.नं. ५७ मध्ये वनविभाग जुन्नर अंतर्गत वनपरिक्षेत्र ओतूर तर्फे वनमहोत्सव २०२३ व शिवजन्मभूमी वृक्ष संवर्धन अभियान २०२३ अंतर्गत ५ हेक्टर क्षेत्रावर वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात आला. सदर वृक्षारोपन अतुल बेनके (आमदार जुन्नर तालुका) यांचे हस्ते करण्यात आले.
तर प्रमुख उपस्थिती अमोल सातपुते, (उपवनसंरक्षक जुन्नर) व अमित भिसे, (सहा. वनसंरक्षक जुन्नर) यांची होती. मंगरूळ या ठिकाणी वनक्षेत्रावर फॉ.कं.नं.५७ मध्ये येड्या बाभळी वाढल्याने बेल्हा जेजुरी महामार्गावर प्रवास करताना वळणावर अपघाताचे प्रमाण वाढले होते. मंगरूळ ग्रामस्थांची सदर वेडया बाभळी काढण्याची मागणी होती.
ती मागणी शासनाने मान्य करून सदर ठिकाणी ५ हेक्टर क्षेत्रावर वेडया बाभळी काढून देशी वृक्ष लावण्याची योजना तयार करण्यात आली. सध्या ५ हे. क्षेत्रावरील वेड्या बाभळी काढण्यात आल्या असून या ठिकाणी १५५५ देशी वृक्षांच्या १८ प्रजातीची लागवड करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमावेळी मंगरूळ गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली. या दिंडीस आमदार अतुल बेनके व उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सारथ्य केले. यासोबतच ज्ञानदा महाविदयालय मंगरूळ चे विदयार्थी स्वप्नवेध अनाथालयाचे मुले, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ मंगरूळ उपस्थित होते. वृक्षदिंडी रोपवनक्षेत्रावर आणून वड, पिंपळ या महावृक्षांची पूजा करून अतुल बेनके यांच्या हस्ते वृक्षलागवड करून वनमहोत्सव कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सदर कार्यक्रमास बोलताना अतुल बेनके यांनी आजच्या काळात वृक्षांचे महत्व सांगितले. वल्लभ बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त या वर्षात शिवजन्मभूमी वृक्ष लागवड अभियान २०२३ ची माहिती दिली व प्रत्येकानी या पावसाळयात कमीत कमी एक झाड लावण्याचे आवाहन केले. अमोल सातपुते यांनी जंगलाची उत्पादन क्षमता वाढवणे गरजेचे असून त्याचा गावाला कसा उपयोग होणार आहे याची माहिती दिली. या पावसाळ्यात वनविभागाकडून जास्तीत जास्त रोपे नेऊन वृक्षलागवड करण्याचे आवाहन नागरिकांना केले.
सदर कार्यक्रमास तारा दत्तात्रय लामखेडे (सरपंच मंगरूळ), मोहन नवले, उपसरपंच मंगरूळ, बाळासाहेब खिलारी, चेअरमन कात्रज दूध संघ, प्रकाश लामखेडे, आम आदमी पार्टी यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आयोजन व्ही.एम. काकडे, वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर, बी. एस. शिंदे, वनपाल खोडद, एन. एम. ढोबळे वनपाल बेल्हे व आर. एस. गाढवे, वनरक्षक व सर्व कर्मचारी वृंद ओतूर वनपरिक्षेत्र यांच्यामार्फत करण्यात आले.