सह्याद्री व्हॅली इंजीनियरिंग कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

1 min read

राजुरी दि.२१:- राजुरी (ता.जुन्नर) येथील सह्याद्री व्हॅली अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासने व प्राणायाम याविषयी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी योगा प्रशिक्षक प्रेम पडळकर यांनी योग प्राणायाम सूर्यनमस्कार आणि ध्यानधारणा आदी विषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.

यावेळी संचालक सचिन चव्हाण, प्राचार्य डॉक्टर संजय झोपे उपप्राचार्य पी. बालारामाडू, प्रा. मयूर घाडगे,ग्रंथपाल उद्धव भारती व सर्व स्टाफ त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी योग दिनानिमित्त सहभाग घेतला.11 डिसेंबर 2014 रोजी, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्व 193 सदस्य राष्ट्रांनी एकमताने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचे मान्य केले, त्यानंतर 21 जून 2015 रोजी पहिला अंतराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

“योग ही भारताच्या प्राचीन परंपरेची एक अमूल्य देणगी आहे. ते मन आणि शरीराच्या ऐक्याचे प्रतीक आहे; मनुष्य आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद, विचार, संतुलन, आणि आरोग्य कल्याणासाठी सर्वांगीण दृष्टीकोन आहे.” आपल्या बदलत्या जीवनशैलीत एक जागरूकता बनून, ती आपल्याला हवामान बदलाचा सामना करण्यास मदत करू शकते. म्हणून आपण आंतरराष्ट्रीय योग दिनाचा अवलंब करण्याच्या दिशेने काम करूया.”

हे केवळ व्यायामाविषयी नाही तर स्वतःमध्ये, जगामध्ये आणि निसर्गामध्ये एकतेची भावना शोधण्याबद्दल आहे. आपल्या बदलत्या जीवनशैलीत ही जाणीव होऊन, ती आपल्याला हवामान बदलाला सामोरे जाण्यास मदत करू शकते. चला तर मग आंतरराष्ट्रीय योग दिन स्वीकारण्याच्या दिशेने काम करूया.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे