मॉडर्नच्या विद्यार्थ्यांना अंजली पारगावकर यांनी दिले योगाचे धडे
1 min read
बेल्हे दि.२१:- योग दिनाचे औचित्य साधून बेल्हे (ता.जुन्नर) येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना योग नारायणगाव येथील विशेषज्ञ अंजली पारगावकर यांनी योगाचे धडे दिले.
अंजली पारगावकर यांनी योग म्हणजे काय? योगाचे फायदे, योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. मोबाईल फोन टी.व्ही. याचे होणारे दुष्परिणाम देखील विद्यार्थांना पटवून दिले. तसेच प्रात्यक्षिकाद्वारे देखील योगाचे महत्व पटवून सांगितले.योग हा दैनंदिन जीवनामध्ये आत्मसात करून विद्यार्थ्यांनी उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली साधावी.
नियमित योगा केल्याने शरीर आणि मन निरोगी राहण्यास मदत होते तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढतं. सध्याच्या धावपळीच्या आयुष्यामुळे अनेकांना अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु योगा केल्याने या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. कामामुळे उद्भवणारा तणाव, चिंता आणि नैराश्य दूर करण्यासाठी देखील योगा मदत करू शकतो. त्या मुळे योग हा नियमित करावा असे प्रतिपादन पारगावकर यांनी केले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सीए सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे,सीईओ शैलेश ढवळे, विश्वस्त दावला कणसे सर्व संचालक मंडळाने योग दिनाच्या शुभेच्या दिल्या. यावेळी शाळेच्या प्राचार्या विद्या गाडगे, उपप्राचार्य के.पी. सिंग, शिक्षक,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.