बाळासाहेब जाधव महाविद्यालय आळे मध्ये योग दिन उत्साहात साजरा

1 min read

आळेफाटा दि.२१:- बाळासाहेब जाधव महाविद्यालय आळे मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून योग दिन उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रवीण जाधव यांनी योग हा दैनंदिन जीवनामध्ये आत्मसात करून विद्यार्थ्यांनी उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली साधावी असे आपल्या मनोगतात व्यक्त केले.

नियमित योगा केल्याने शरीर आणि मन निरोगी राहण्यास मदत होते तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढतं. सध्याच्या धावपळीच्या आयुष्यामुळे अनेकांना अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु योगा केल्याने या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. कामामुळे उद्भवणारा तणाव, चिंता आणि नैराश्य दूर करण्यासाठी देखील योगा मदत करू शकतो.

मी ही रोज योग करत असल्याचे जाधव यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. योग प्रशिक्षक म्हणून आर्ट ऑफ लिव्हींग चे योग शिक्षक डॉ. अरुण गुळवे यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षक यांच्याकडून योगासने, प्राणायाम व ध्यानधारणा याची प्रात्यक्षिके करून घेतली व योग हा शरीर, श्वास आणि मन यांचा समन्वय साधणारा प्रमुख मार्ग असल्याचे उपस्थितांना समजावून सांगितले.

कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष अजय कुऱ्हाडे, सचिव अर्जुन पाडेकर, उपाध्यक्ष सौरभ डोके, संस्थेचे खजिनदार अरुण हुलावळे, संस्थेचे संचालक बाळासाहेब जाधव, किशोर कुऱ्हाडे, बबनराव सहाणे , भाऊदादा कुऱ्हाडे, उल्हास सहाणे, शिवाजी गुंजाळ, बाबु कुऱ्हाडे, जीवन शिंदे, दिनेश सहाणे, प्रदीप गुंजाळ, सम्राट कुऱ्हाडे, देविदास पाडेकर, कैलास शेळके, रमेश कुऱ्हाडे आदींनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे नियोजन एनसीसी चे प्रमूख प्रा. रावसाहेब गरड , प्रा. डॉ. सुषमा कदम, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. जयसिंग गाडेकर , प्रा. मनीषा गिरी , प्रा.विकास पुंडे,विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. संतोष राठोड यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लेफ्टनंट सुषमा कदम यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे