सावधान! आपण खात असलेले पनीर भेसळयुक्त तर नाही ना? भेसळयुक्त पनीर बनवणाऱ्या डेअरीवर पोलिसांचा छापा; ६ जणांना अटक
1 min readपुणे दि.१२:- भेसळयुक्त पनीर तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा मारून पोलिसांनी तब्बल ५४६ किलो भेसळयुक्त जप्त केले आहे. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने चिंचवड मधील महाराष्ट्र कारवाई केली असून या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.साजीद मुस्तफा शेख (वय ३२, रा. पडवळनगर थेरगाव पुणे), श्रीबुध्दराम सिंग (वय २६),जावेद मुस्तफा शेख (वय-३८), अल्ताफ हजरतद्दीन शेख (वय- २७), अभिषेककुमार योगेशबाबु यादव (वय-२२), सर्फराज शराफतउल्ला शेख (वय ३५, रा. चित्तराव गणपती मंदिराजवळ चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे अन्न व औषध प्रशासन विभागाचे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार प्रदीप गोडांबे व पोलीस नाईक आशिष बोलके यांना मिळालेल्या बातमीवरून, चिंचवड येथे असलेल्या महाराष्ट्र देवीवर छापा मारण्यात आला.
यात मिसळीत पनीर तयार करण्यात करिता वापरण्यात आलेली असलेले 14 हजार रुपये किमतीचे 140 लिटर असेंटिक ऍसिड, 6320 रुपये किमतीचे साठ लिटर आरबीडी पमोलीन तेल, 4500 किमतीचे २५ किलो ग्लिसरील मोनो स्टीअरेट,3 लाख बत्तीस हजार पाचशे रुपये किमतीचे 875 किलो स्कीमड पावडर, एक लाख नऊ हजार दोनशे रुपये किमतीचे 546 किलो भेसळयुक्त तयार पनीर असा ऐकून 4 लाख 66 हजार 520 रुपये किमतीचा मुद्देमाल अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी जप्त केला.
खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहायक पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक दुधावणे, या पथकाने कारवाई केली.