शिक्षकांच्या बदलीने विद्यार्थ्यांना अश्रू आणावर

वडगाव आनंद दि. १५ – जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या शिक्षकांच्या बदल्या ऐन दिवाळीच्या तोंडावर करण्यात आल्या. बदली होणे हा एक प्रशासकीय भाग असला तरी शिक्षक व विद्यार्थी यांचे नाते हे एक वेगळेच जुळलेले असते. शिक्षक तर आपल्या पुढच्या मुलाप्रमाणेच शाळेतील विद्यार्थ्यांची वागत असतात. याचाच एक भाग जर आपण पाहिलात तर बदली होताना ज्याप्रमाणे शिक्षक बंधू आणि भगिनींना शाळा सोडणे अतिशय अवघड जाते.कारण सदर शाळेत त्यांनी गेले अनेक वर्ष काम केलेले असते, शाळा सोडताना जसे विद्यार्थी बोलतात, ढसाढसा रडतात त्याचप्रमाणे शाळेच्या प्रांगणातील असणाऱ्या आठवणी लावलेले वृक्ष वाढवलेला इमारतीचा परिसर हा देखील जरी मुका असला तरी शाळा सोडताना शिक्षकांशी बोलल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारच्या भावना शाळा सोडताना सर्वांच्या मनात आल्याशिवाय राहत नाहीत.आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव आनंद या शाळेच्या तीन शिक्षिका अनुक्रमे वृषाली कालेकर, संगीता कुदळे व मनीषा इले यांच्या शास्त्रीय प्रणालीमुळे बदल्या झाल्या यातील कोणी साडेसात वर्षात तर कोणी अकरा वर्ष या वडगाव यांच्या शाळेत शिकवण्याचे पवित्र काम केले. आणि त्यामुळे त्यांचा आणि मुलांचा त्याचप्रमाणे व्यवस्थापन समितीचा इतका सलोख्याचा संबंध निर्माण झाला. की त्यामुळे त्यांना शाळा सोडणे व विद्यार्थी तसेच व्यवस्थापन समितीला त्यांना निरोप देणे इतके अवघड होऊन बसले की व्यवस्थापनाचे सर्व पदाधिकारी तसेच शाळेत शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी अगदी ढसाढसा रडत होते. गेले अनेक वर्षाचे तयार झालेले ऋणानुबंध त्याचप्रमाणे सर्व शिक्षकांनी मिळून शाळेची वाढवलेली गुणवत्ता त्याचप्रमाणे शाळेसाठी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, किल्ला स्पर्धा, जिल्हा परिषद अध्यक्ष चषक, परसबाग स्पर्धा त्याचप्रमाणे मंथन सारख्या स्पर्धेत सातत्याने गोल्ड मेडल आपल्या विद्यार्थ्यांना कसे मिळतील. या ध्येयाने वेडे झालेले शिक्षक असा सर्व प्रवास एकत्र करताना आणि बदलीच्या प्रक्रियेमुळे शाळेतून कार्यमुक्त होताना निश्चितपणे शिक्षकांना वाईट वाटणे साहजिक होते परंतु निरागसपणे प्रेम करणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय प्रणालीच्या बाबत पूर्णपणे माहिती नसते आणि त्यांचे आणि शिक्षकांचे अचानक बदलीमुळे तुटलेले नाते मुलांना आपल्या शिक्षकांना निरोप देताना पाहताना किंवा जाताना मुलांचे असणारे अश्रू नवे नवे तर अश्रूचे बांध तुटून वाहिल्याशिवाय राहत नाहीत.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव आनंद या शाळेच्या कर्तव्यनिष्ठ, लाडक्या व एक संगतीने काम करणाऱ्या शिक्षकांना सस्नेह निरोप देताना शाळेचे मुख्याध्यापक सुनील टिकेकर, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय चौगुले पाटील,शाळेचे माजी विद्यार्थी तथा दूध संस्थेचे चेअरमन गणेश वाघमारे, शाळेचे सर्वेसर्वा डी.बी वाळुंज त्याचप्रमाणे शाळेच्या संगणक शिक्षिका गौरी डुंबरे व सीमा वाळुंज यादेखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होत्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!