श्री गणेशा पतसंस्थेची दुसरी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

1 min read

वडगाव कांदळी दि.१५:-श्री गणेशा नागरी सहकारी पतसंस्थेची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन सुनील देवराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली आणि खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली. यावेळी व्हा. चेअरमन रवींद्र वामन, सचिव वर्षा पिंगळे, खजिनदार सोमनाथ रेपाळे, संचालक अविनाश पवार, इंद्रभान गायकवाड, विनोद निलख, महेंद्र सोनवणे, उत्तम पवार, रमेश खुडे, गणेश खेडकर, संचालिका शोभा पाचपुते, वैशाली शिंदे, व्यवस्थापक शशिकांत पवार, लेखनिक श्रुतिका सोनवणे, दैनंदिन ठेव प्रतिनिधी शुभम राजू पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक व वडगाव कांदळीचे उपसरपंच संजय खेडकर, बिरोबा महाराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष देविदास भोर, डिजिटल ग्रामपंचायत कांदळीचे सदस्य विनायक गुंजाळ, रेश्मा फुलवडे, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन नितीन पवार, प्रसिद्ध निवेदक सुभाष लांडगे, साईलक्ष्मी पतसंस्थेच्या संचालिका पूजा मुटके, शिवाजी भोर, सुनील पटाडे, सुरेश निलख, अरुण पाचपुते, उस्मान पठाण, दत्तात्रय पवार, विठ्ठल पवार, राजाराम निलख, बबन पवार, संदीप हाडवळे, गणेश काळे, रामदास भोर, विठ्ठल पाचपुते, बार्शीनाथ पाचपुते चंद्रकांत पवार, रंगनाथ पाचपुते व अनेक ग्रामस्थ आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आर्थिक क्षेत्रात संस्थेने कमी काळात फार मोठी भरारी घेतल्यामुळे सर्व उपस्थित मान्यवरांनी संचालकांवर कौतुकाचा वर्षाव केला.श्री गणेशा नागरी सहकारी पतसंस्थेने दूरदृष्टीने विचार करून तालुका कार्यक्षेत्र घेतलेले आहे. परिसरात तालुका कार्यक्षेत्र असणारी ही एकमेव संस्था आहे आणि सर्व संचालक काटकसरीने कारभार करीत असून आर्थिक बाबतीत अडचणीत आलेल्या सभासदाला मदत करण्याचा संस्थेचा मानस उल्लेखनीय आहे, असे विचार विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय खेडकर यांनी व्यक्त केले.दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या श्री गणेशा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये 2400 सभासद असून रु. 2 कोटी 40 हजाराच्या ठेवी आहेत. संस्थेने रु. 45 लाख 40 हजाराची गुंतवणूक केलेली असून रु. 1 कोटी 43 लाख 28 हजार कर्ज वाटप केलेले आहे. संस्थेचे खेळते भांडवल रु. 2 कोटी 18 लाख 75 असून संस्था पूर्णपणे स्थिर स्थावर आहे. संस्थेचे नेट एनपीए शून्य टक्के असून संस्थेने कोणत्याही बँकेचे कर्ज घेतलेले नाही. संस्थेला या आर्थिक वर्षात ऑडिट वर्ग ‘ब’ मिळालेला आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र जुन्नर तालुका असून संस्थेतर्फे सभासदांना आरटीजीएस, एनइएफटी, गृहतारण कर्ज, वाहनतारण कर्ज व जामीनकी कर्ज या सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत.सर्व सभासदांना ऑनलाइन बँकिंग सुविधा उपलब्ध करण्याचा संस्थेचा मानस आहे. संस्थेने सर्व कर्जदारांचा विमा उतरवलेला असून भविष्यात सर्व सभासदांचा विमा उतरविण्याचा संस्थेचा मानस आहे, अशी माहिती चेअरमन सुनील पवार यांनी दिली.वार्षिक सभेचे अहवाल वाचन व्यवस्थापक शशिकांत पवार यांनी केले. सभेचे सूत्रसंचालन संचालिका शोभा पाचपुते यांनी केले आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार बिरोबा महाराज सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष देविदास भोर यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!