पुणे-नगर महामार्गावर मोठा अपघातात; सात जखमी

1 min read

रांजणगाव गणपती दि.१५:- कारेगाव (ता. शिरूर) येथील पुणे-नगर महामार्गावरील एशियन चौकात रविवारी (दि.१२) रात्री दहाच्या सुमारास एका भरधाव किया कारने रिक्षाला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सातजण जखमी झाले असून, चार वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.हेमंत इनामे (रा. रांजणगाव) यांनी त्यांची किया कार एमएच १२ व्हीक्यू २१८८ अतिवेगाने निष्काळजीपणे चालवून पॅगो रिक्षाला धडक दिली. या धडकेत रिक्षाजवळ उभे असलेले पुरुषोत्तम काठोळे, अभिषेक पवार, संधी म्हस्के, किशोर राठोड, आरती राठोड, सुमीत मगर आणि नितीन चौधरी (सर्व रा. कारेगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत.या अपघातात रिक्षा, दोन मोटरसायकली आणि किया कार अशा चार वाहनांचे नुकसान झाले आहे. रिक्षाचालक अनिल भागवत काठुळे (वय २५, रा. कारेगाव) यांनी याप्रकरणी रांजणगाव पोलिसात फिर्याद दिली असून, आरोपी हेमंत इनामे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!