शरदचंद्र पवार अभियांत्रिकी महाविद्यालयात निरोप समारंभ व माजी विद्यार्थी मेळावा संपन्न
1 min read
ओतूर दि.१७:- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग या ठिकाणी शुक्रवार दि.१६ रोजी निरोप समारंभ व माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला .
कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी. यु खरात, संगणक विभागप्रमुख डॉ. सुनील खताळ , इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन विभागप्रमुख प्राध्यापक स्वप्निल डुंबरे ,महाविद्यालय परीक्षा विभाग अधिकारी प्राध्यापक शिवाजी गायकवाड,महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी डॉ. मोनिका रोकडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी व माजी विद्यार्थ्यानी आपले मनोगते व्यक्त केली. त्यामध्ये प्रामुख्याने आरती दौलत औटी या विद्यार्थिनींने आपण घरून वडिलांकडून काहीही पैसे न घेता आपला व्यवसाय कसा सुरू केला, भांडवल कसे उभे केले व आज व्यावसायिक म्हणून कसे उभे आहोत हा आपला अनुभव विशीद केला.
आशिष गाडेकर यांनी बजाज ऑटोमधील आपली यशोगाथा कथन केली. तसेच राहुल चौधरी यांनी आपण मेडिकल उपकरण निर्मिती व विक्री कश्या प्रकारे केली व कोविड कालावधीत आपण गरीब गरजूंना कमी पैशात निरनिराळ्या टेस्ट उपलब्ध करून दिल्या. व सरकारी दवाखान्यात रुग्णांना कशी मदत केली याचा आपला अनुभव विद्यार्थ्यांसमोर कथन केला.
अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयातील घालवलेला कालावधी, अभ्यास , महाविद्यालयाने आयोजित केलेले निरनिराळ्या कार्यशाळा, सेमिनॉर विविध उपक्रम व प्राध्यापकांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद खरात यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या भावी जीवनात मिळालेल्या संधीचा कसा फायदा घ्यावा व निरंतर नवनवीन गोष्टी शिकत रहाव्या या संबंधी मार्गदर्शन केले.संगणक विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सुनील खताळ यांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी माजी विद्यार्थी संघटनेमार्फत जोडून रहावे.
आपल्या जूनियर्सना मार्गदर्शन , नोकरीसाठी शिफारस इत्यादी गोष्टी करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले. तसेच इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन विभागप्रमुख प्राध्यापक स्वप्निल डुंबरे यांनी विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाचे परीक्षा विभाग अधिकारी प्राध्यापक गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना IOT ( इन्फॉर्मेशन ऑफ टेक्नॉलॉजी ) या विषयासंदर्भात आजचे व भविष्यातील स्थान, संधी, फायदे व भविष्यातील संकटे या संदर्भात मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांसाठी मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला होता. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक नीता बाणखेले तर सूत्रसंचालन प्राध्यापक पूजा घोलप यांनी केले.