कौतुकास्पद! NEET परीक्षेत अनन्या धांडे हिने मिळवला ऑल इंडिया ५७२ रँक
1 min read
आळेफाटा दि.१८:- आळेफाटा (ता.जुन्नर) येथील डॉ.राजेंद्र धांडे यांची कन्या अनन्या धांडे हिला नीट परीक्षेत ७२० पैकी ६९५ मार्क मिळाले असुन तिने भारतातुन ५७२ वा रॅंक मिळवला आहे. अनन्या हीचे शिक्षण पुणे येथील मिलिनियम नॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज कर्वेनगर पुणे येथे झाले.
अनन्या ही आई वडीलांना एकुलती असून तिचे वडील डॉ.राजेंद्र धांडे याच आळेफाटा येथे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल असून ते प्रसिद्ध स्रीरोग तज्ञ आहेत तर आई पुणे येथेल जोशी हॉस्पिटल मध्ये Radiologist म्हणून कार्यरत आहे. या वर्षी देशभरातून २० लाख ८७ हजार विद्यार्थी नीट ची परीक्षा दिली. अनन्या हिला एफसी रोड पुणे येथील डॉ.अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी यांच्या क्लास चे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
जिद्द व चिकाटीच्या जोरावर तिने अभ्यास करून हे मोलाचे यश मिळवले आहे.तिच्या या यशाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे, तालुक्याचे आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे यांनी कौतुक केले असून तिचे अभिनंदन केले आहे. अनन्याला दिल्ली येथे एमबीबीएस चे शिक्षण घ्यायचे असून तिला पुढील शिक्षणासाठी आळेफाटा व परिसरातील ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या.