कारेगाव येथे शिवसेनेच्या वतीने दहावी,बारावी च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव

मंचर दि.१५ : आंबेगाव तालुक्यातील कारेगाव येथे दहावी, बारावी, स्पर्धा परीक्षांतील यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुक्याच्या वतीने पार पडला याप्रसंगी प्रा.सुरेखा निघोट महिला आघाडी तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख चंद्रकला पिंगळे,वाकेश्वर,पेठ संस्थेचे महेंद्र धुमाळ.

कारेगाव सरपंच सुमन कराळे,या.सरपंच कविता घेवडे, थुगाव च्या मा.सरपंच राजश्री एरंडे
ग्रा.पं.सदस्य रेखा एरंडे, कारेगाव तंटामुक्ती अध्यक्ष महादेव कराळे, उपाध्यक्ष भानुदास कराळे ग्रामस्थ, जि.प.प्रा.शाळा मुख्याध्यापक मिरा कातळे,शिक्षक वसंत नाटे, पांडुरंग सुट्टे कार्यक्रम संयोजक सातगाव पठार शिवसेना नेते बाबाजी कराळे महिला भगीनी, गुणवंत विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


यावेळी तालुका कृषी अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल प्रविण थिगळे , तसेच वाकेश्वर विद्यालय,पेठ,नवखंड विद्यालय पारगाव, सोमनाथ नवले विदयालय भावडी, हरिश्चंद्र तोत्रे विदयालय कुरवंडी,जी.प.शाळा कारेगाव येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी तालुका प्रमुख प्रा. सुरेखा अनिल निघोट यांनी ग्रामीण भागातसुद्धा मुलीचं क्रमांकात दिसतात.

शिक्षक पालकांनी मुलांना समजावून भविष्यात शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यावे असे सांगितले,तर महेंद्र धुमाळ यांनी पालक विद्यार्थ्यांनी जेईई मेन, सीईटी परीक्षांवर लक्ष केंद्रित करावे असे आवाहन केले.आभार चंद्रकला पिंगळे उपतालुका प्रमुख महिला आघाडी यांनी मानले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे