MPSC तून भाऊ क्लास वन अधिकारी तर बहीण क्लास 2 अधिकारी,भावाचा राज्यात 4 था क्रमांक

1 min read

टाकळी ढोकेश्वर दि.१६:-टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथील शैलेश गोरक्षनाथ झावरे व श्वेता गोरक्षनाथ झावरे यांची MPSC तून निवड होऊन भाऊ राजपत्रित class 1 अधिकारी आणि बहीण राजपत्रित class 2 अधिकारी झाली आहे.

MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2021 मध्ये शैलेश ची निवड होऊन त्याला जलसंपदा विभाग मिळाला असून सहायक कार्यकारी अभियंता राजपत्रित वर्ग 1 अधिकारी जलसंपदा विभागातील सर्वोच्च पद मिळाले असून त्याचा महाराष्ट्रातून चौथा क्रमांक आला आहे.त्याचे शिक्षण BE Civil Engineering झाले असून तो RMD सिंहगड स्कूल ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज, पुणे 2019 मध्ये pass-out झाला होता. त्याची आई गृहिणी असून वडील सेवानिवृत्त शिक्षक आहेत.

त्याची बहीण श्वेता गोरक्षनाथ झावरे ही MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2019 मध्ये उत्तीर्ण झाली होती तर महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या सहायक अभियंता (Class – 2) पदावर कार्यरत आहे.शैलेश ला त्याच्या बहिणीने मार्गदर्शन केले,त्याचा फायदा ही झाला.

शैलेश चा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार निलेश लंके,माजी विधानपरिषद सदस्य आमदार सुधीर तांबे, विधानपरिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे, आमदार अतुल बेनके, माझी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी सन्मान करून शुभेच्छा दिल्या.तर सेवानिवृत्त नायब तहसीलदार भिमाजी दाते, तसेच नितीन साठे, रामदास दाते, श्रीधर झावरे, अक्षय वदक, सर्व नातेवाईक व मित्रपरिवार, ग्रामस्थ यांनी अभिंदन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे