श्री रंगदास स्वामी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी विठ्ठल दाते यांची बिनविरोध निवड
1 min readआणे दि.१३:- आणे (ता.जुन्नर) श्री रंगदास स्वामी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी पेमदरा गावचे विठ्ठल दाते यांची तसेच व्हाईस चेअरमनपदी संतोष आल्हाट यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
माजी चेअरमन बाळासाहेब दाते, शिवाजी बेलकर (मा.कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर, किरण आहेर (मातोश्री संकुल कर्जुले हर्या) व रोहिदास शिंदे (मा. सरपंच शिंदेवाडी), डॉ.दिपक आहेर , सिताराम दाते,शंकर आहेर, बाजीराव भोसले , सुरेश शिंदे , बाळासाहेब शिंदे, जिजाभाऊ बेलकर, बबन गोफणे, आसिफ शेख, देऊबाई बेलकर, चंन्द्रभागा दाते यांच्या सहकार्याने निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून संतोष भुजबळ यांनी काम पाहिले.