वासरांना कत्तलिसाठी घेऊन जाणाऱ्या गाडीवर पोलिसांची कारवाई; एक अटक, दोन फरार
1 min read
आळेफाटा दि.१०:- आळेफाटा (ता.जुन्नर) पाच वासरांना कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या एका गाडीला आळेफाटा पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान पकडले असून तिघांवर ती कारवाई केली असून एकाला अटक केली तर दोघे फरार आहे.
या विषयी आळेफाटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवार दि. ९ रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आळेफाटा गावचे हद्दीत पोलीस स्टेशनचे समोर कल्याण- अहमदनगर हायवे रोडवर नाकाबंदी दरम्यान ५ जर्सी गाईची वासरे आरोपी कलीम इकबाल कुरेशी याने त्यांच्या ताब्यातील मारुती कंपनीची स्विफ्ट कार क्रमांक एम एच 43 डी 8717 हिचे खिडकी मधून आरोपी अमीर कुरेशी याचेसह आरोपी अशपाक व्यापारी (पूर्ण नाही) याचे सांगण्यावरून मढ पारगाव (ता.जुन्नर) येथून पतलीसाठी बेल्हे (ता. जुन्नर) येथे घेऊन जात असताना पोलिसांना मिळून आले आहेत.वरील तिघांविरुद्ध पोलिसांनी कायदेशीर तक्रार केली आहे.पुढील तपास आळेफाटा पोलिस करत आहे.