शेतक-यांचे सोयाबीन, गहु चोरणाऱ्या आठ जनांच्या टोळीला पकडण्यात आळेफाटा पोलीसांना यश; राजुरीतून दोघांना अटक; आळ्यातील तीन आरोपी फरार

1 min read

आळेफाटा दि.१७:- आळेफाटा पोलीस स्टेशन हदिदत शेतक-यांनी कष्ठाने पिकवलेले धान्य रात्रीचे वेळी शेतक-यांचे घराजवळुन चोरी करणा-या गुन्हेगारांची टोळी काही दिवसांपूर्वी सक्रिय झाली होती. सदर टोळीचा शोध घेणे बाबत अंकित गोयल (पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण,) मितेश घटटे (अपर पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण), रविंद्र चौधर (उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर,) विभाग जुन्नर, यांचे मार्गदर्शना खाली आळेफाटा पोलीस स्टेशन चे पो.नि. यशवंत नलावडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली असता त्यांनी वरिष्ठांचे आदेशाने तपास पथक निर्माण करून त्यामध्ये सहा पो.नि. सुनिल बडगुजर सो, पो.स. ई. पवार सो, पो.हवा गोसावी, पो.कॉ लोहोटे, पो.कॉ कोबल, पो. कॉ. नविन अरगडे असे दिनांक १२ जून २०२३ रोजी बातमी प्रमाणे रवाना होऊन सदर आरोपींनी गुन्हयामध्ये वापरलेली मो.सा. गाडी नं एम.एच १४ जे क्यु ६९५८ हिचेसह एक संशयीतास गणेश डेअरी जवळ राजुरी येथून ताब्यात घेवुन धान्य चोरीचे गुन्हया बाबत चौकशी केली असता

 त्यानी सदर गुन्हयामध्ये एकुण ८ आरोपीं असल्याचे सांगीतल्याने तपास पथकाने त्यापैकी ५ आरोपींना राजुरी परीसरातुन ताब्यात घेवुन पोलिसांनी गुन्हा तपास केला असता त्यामध्ये ३ आरोपी हे विधीसंघर्षीत बालक असल्याने त्यांना बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपी १) किरण उर्फ बॉडी शिंदे (रा आळे ता जुन्नर जि पुणे, २) ज्ञानेश्वर उर्फ आरडीएक्स वाव्हळ रा.आळे ता जुन्नर जि पुणे, ३) रोहण चव्हाण रा.आळे ता जुन्नर जि पुणे पुर्ण नाव माहीती नाही हे ३ आरोपी अदयाप पर्यंत गुन्हयात वापरलेले पिकअप वाहनासह फरार आहे.

तपास पथक त्यांचा शोध घेत असुन आरोपी नामे १) अनिकेत अशोक घंगाळे (वय २० वर्षे रा राजुरी ता जुन्नर जि पुणे, २) गणेश व्यंको फुलमाळी वय १९ वर्षे रा राजुरी ता जुन्नर जि पुणे या २ आरोपींना जुन्नर न्यायालयामध्ये हजर करून ४ दिवसांची पोलीस कस्टडी मंजूर झाल्याने सखोल तपास केला असता सदर आरोपींनी आळेफाटा पोलीस स्टेशन हददीमध्ये दि. २६/०४/२०२३ गु.र.नं १९३/२०२३ भा.दं.वि कलम ४५४, ३८०, ३४ प्रमाणे गुन्हा केल्याचे कबूल करून सदर

 दाखल गुन्हयामध्ये राजुरी व आळे येथील एकुण ८ आरोपींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगीतले तसेच धान्य चोरीसाठी त्यांनी आळे येथील एका पिकअप के एम एच १४ के ए ३७०९ या वाहनाचा व राजुरी येथील 9 मोटार सायकल के एम.एच १४ जे क्यु ६९५८ हिचा वापर केला आहे. तसेच सदरचे धान्य नगर जिल्हयात विक्री केल्याचे सांगीतल्याने त्यापैकी १२ पोती गहु व एक मोटार सायकल क एम.एच १४ जे क्यु ६९५८ हि हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले आहे. त्यापैकी ३ फरार आरोपी, गुन्हयातील पिकअप क एम एच १४ के ए ३७०९ या वाहनासह उर्वरित धान्याचा तपास पथक शोध घेत आहे.

सदरची कामगीरी ही अंकित गोयल (पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण), मितेश घटटे (अपर पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण), रविंद्र चौधर, उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर, विभाग जुन्नर, यांचे मार्गदर्शना, पो. नि. यशवंत नलावडे साो, सहा पो. नि. सुनिल बडगुजर लो, पो.स.ई अनिल पवार सो, पो.हवा. विकास गोसावी, पो. कॉ. प्रविण लोहोटे, पो. कॉ. सचिन कोबल, पो. कॉ. नविन अरगडे पो. मित्र निलेश शितोळे यांचे पथकाने केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे