ओतूर पोलिसांनी केला १२ किलो गांजा जप्त; दोघांना अटक

1 min read

ओतूर दि.१०: कल्याण – नगर महामार्गावर ओतूर (ता.जुन्नर) पोलीसांनी गांजाची वाहतुक करणाऱ्या आरोपींना रंगेहाथ पकडले असून अंदाजे किंमत सहा लाख साठ हजार आठशे रूपयाचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे व पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके यांनी दिली.
सिध्दार्थ किशोर टेकाडे (वय ३१) रा. संगमनेर, वाडेकर गल्ली, संतोष दत्तात्रय जऱ्हाड (वय ३७) रा. थोरात किडा संकुल जवळ माळीवाडा दोघे ही ता. संगमनेर जि. अहमदनगर हे असून १२ किलो ४०० ग्रॅम वजनाचा तपकीरी रंगाचा, उग्र वास येत असलेला गांजा व बोलेरो गाडी नं. एम. एच. १७ बी.एस. ०३३६ ही जप्त करण्यात आली आहे.

याबाबत ओतूर पोलिसांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अहमदनगर बाजुकडुन कल्याण बाजुकडे पांढरे रंगाची बोलेरो गाडी (नं. एम. एच. १७ बी. एस. ०३३६) या मधुन गांजा या अंमली पदार्थाची वाहतुक होणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार ओतूर गावचे हद्दीत अहमदनगर- कल्याण हायवेवर मांडवी नदिचे पुलाजवळ कातकरी वस्तीच्या बाजुला सापळा गुरूवारी रात्री सिध्दार्थ टेकाडे व संतोष जऱ्हाड यांना हे त्यांच्याकडील पांढरे रंगाची बोलेरो गाडी नं. एम. एच. १७ बी. एस. ०३३६ यामुधन अहमदनगर बाजुकडुन कल्याण बाजुकडे जात असताना मिळुन आली. त्यानंतर सदरच्या वाहनाची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता त्यामध्ये १२ किलो ४०० ग्रॅम वजनाचा तपकीरी रंगाचा, उग्र वास येत असलेला गांजा हा अंमली पदार्थ मिळुन आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे