चिंचोली काशीदमध्ये बौद्धाचार्य श्रामनेर शिबिर संपन्न
1 min readचिंचोली दि.८:-भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम अंतर्गत शाखा जुन्नर तालूका कार्यकारिणीच्या वतीने १० दिवसीय बौद्धाचार्य श्रामनेर शिबिराचे आयोजन धम्मनगरी चिंचोली काशीद आनंद बुद्ध विहार येथे आयोजित करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाचे सांगता समारंभ बुधवार दि.७ रोजी संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमा करीता प्रमुख उपस्थिती भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिमचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रकाश ओव्हाळ गुरुजी, तालुका अध्यक्ष राकेशजी डोळस, पुणे जिल्हा पश्चिम चे सरचिटणीस भगवान शिंदे, कोषाध्यक्ष राजेंद्र भोसले, प्रचार पर्यटन सचिव अरविंद पंडित, हिशोब तपासणी रवींद्र अभंग. जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, वंदना काशीद भवतु सब मंगलम चे सर्वेसर्वा आद. शांतू जी डोळस , विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक विकास जी डोळस भारतीय बौद्ध महासभेचे जुन्नर तालुका कार्यकारणीचे, सरचिटणीस संजय धोत्रे गुरुजी कोषाध्यक्ष चंद्रकांत जावळे गुरुजी, नितीन साळवे, प्राचार्य अजित अभंग, प्राध्यापक गणेश रोकडे.
प्रभाकर धोत्रे, वनिता घायतडके, विजय वाघमारे, यशवंत गायकवाड, एकता पंडित, अनिकेत घाय तडके, दीपक खरात, उत्तम कदम, गौतम थोरात, आरपीआय अध्यक्ष गौतम लोखंडे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष गणेश वाव्हळ, आर पी आय जिल्हाध्यक्ष पोपट राक्षे,बौद्ध प्रगती मंडळाचे सर्व पदाधिकारीआदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात धम्म रॅलीने झाली धम्म रॅलीचे उद्घाटन धम्मराथाला पुष्पहार घालून चिंचोली गावचे आद्य नागरिक सरपंच खंडू काशीद यांच्या हस्ते करण्यात आले भगवान गौतम बुद्धांचा शांतीचा संदेश गावोगावी खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय बौद्ध महासभेद्वारे गौतम बुद्धांचा भिकू संघ धम्म रॅलीद्वारे केले. उपस्थित मान्यवरांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन बौद्ध प्रगती मंडळ चिंचोली काशीद यांनी केले.