राजुरीत येरे येरे पावसा; देवाला अभिषेक व दिंडी

1 min read

राजुरी दि.८:- राजुरी (ता.जुन्नर) हनुमान देवस्थान ट्रस्ट आयोजित पर्जन्य दिंडी सोहळा राजुरी ते श्री क्षेत्र उंचखडक येथील खिंडीतला मुळ भैरवनाथ येथे बुधवार दि. ७ रोजी आयोजित केला होता. टाळ मृदुंगाच्या जयघोषात कलश घेऊन महीला वर्ग व भाविक सहभागी झाले होते. यावेळी ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांवर भरपूर पाऊस होण्यासाठी खबडी येथे अभिषेक करण्यात आला. आरती नंतर वनभोजन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी हनुमान देवस्थान चे अध्यक्ष मुरलीधर औटी, उपाध्यक्ष बाळासाहेब हाडवळे, कॅप्टन महादेव हाडवळे, ममताराम हाडवळे, गणेश दुध संस्थेचे संचालक तुकाराम डुंबरे शिवसेनेचे विभागप्रमुख श्रीहरी हाडवळे, नंदकुमार हाडवळे, पांडुरंग औटी, नामदेव औटी तानाजी नवले सह भाविक भक्त उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे