राजुरी येथे पशुसंवर्धन विभागामार्फत एल.डी.ओ. डॉक्टरांची नियुक्ती

1 min read

राजुरी दि.७:- जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील गणेश सहकारी दूध संस्थेसह ग्रामपंचायत व विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच आजी-माजी आमदार, खासदार यांचे मार्फत वेळोवेळी राज्याच्या पशुसंवर्धन विभागातील विविध स्तरांवर गेल्या काही वर्षापासून पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 ची मागणी करण्यात येत होती.

या कामी पहिले पाऊल म्हणून पशुसंवर्धन विभागाने श्रेणी-2 च्या पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी एल.एस. एस. डॉक्टरांच्या जागेवर एल.डी.ओ.डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. यामुळे भविष्यात राजुरी व परिसरातील शेतकऱ्यांना दवाखान्या मार्फत दिल्या जाणाऱ्या श्रेणी-1च्या सुविधा सुलभरित्या प्राप्त होतील तसेच शेतकऱ्यांना शासकीय व पशुवैद्यकीय सेवेसाठी प्रशासकीय काम गतिमान होईल.

यामध्ये ग्रामस्थांचा वेळ व पैसा यांची मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याने त्यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे. राजुरी गावातील ग्रामस्थ व गवळी बांधवांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.अशी माहिती पंचायत समिती जुन्नर चे माजी सभापती व ग्रामनेते दिपक औटी यांनी दिली.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे