निमगाव सावात राष्ट्रपुरुषांच्या जयंती निमित्त ८३ रक्तदात्यांनी केले रक्तदान

1 min read

निमगाव सावा दि.७:- निमगाव सावा (ता.जुन्नर) येथील श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि निमगाव सावा ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रपुरुषांच्या जयंतीनिमित्त ८३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे आयोजन प्राथमिक आरोग्य कंद्रात करण्यात आले होते.संकलित झालेले रक्त संजीवनी ब्लड बँक पुणे येथे पाठविण्यात आले. श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी राष्ट्रपुरुषांची जयंती साजरी केली जाते.

समाजातील तरुणांना राष्ट्रपुरुषांच्या कार्याची माहिती व्हावी, तसेच या राष्ट्रपुरुषांचे विचार समाज आणि नवतरुणापर्यंत पोहोचावेत, त्यांच्या विचारांची देवाणघेवाण आणि अंगीकार व्हावा, त्याच्यातून राष्ट्र निर्मितीचे कार्य घडवावे आणि नवीन पिढीला आदर्श निर्माण व्हावा. अशा विविध हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुरुवातीला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राष्ट्रपुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

रक्तदान शिबिरासाठी संजीवनी ब्लड बँक पुणे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आणि निमगाव सावा ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले. रक्तदान शिबिरामध्ये महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक, तसेच निमगाव सावा आणि परिसरातील ग्रामस्थ सहभागी झाले होते. रक्तदानातून जसा आपण दुसऱ्याचा जीव वाचवतो तसेच आपण आपले स्वतःचे जीवन सुरक्षित करणे गरजेचे असते. 

या प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, संचालक दत्तात्रय घोडे गुरुजी, निमगाव सावाचे सरपंच किशोर घोडे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष परशुराम लगड, संदीप भाऊ थोरात, इब्राहिम शेख पटेल, अब्दुल अब्दुल पटेल, योगेश गाडगे, सचिन उनवणे, संतोष गाडगे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.मिलिंद यादव, डॉ. घोडे,संजय उनवणे, विजय महाराज खाडे, अक्षय घोडे, निवृत्ती पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. छाया जाधव, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व सेवक कर्मचारी उपस्थित होते.


यावेळी पांडुरंग पवार यांनी उपस्थित तरुणांना आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रपुरुषांच्या आदर्श समोर ठेवून कार्य करण्याचे तसेच रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदानाचे आवाहन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे