लव्ह जिहादच्या विरोधात सकल हिंदू समाजाचा संगमनेरमध्ये भगवा मोर्चा

1 min read

संगमनेर दि.६ :- विघातक प्रवृत्ती आणि लव्ह जिहादच्या विरोधात संगमनेरात सकल हिंदू समाजाच्यावतीने भगवा मोर्चा काढण्यात आला. हिंदु धर्माच्या रक्षणासाठी संगमनेर आणि अकोले तालुक्यातील हजारोच्या संख्येने सहभागी झालेल्या हिंदु समाज बंधू भगिणींच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

संगमनेर नगरपालिकेजवळील लाल बहादुर शास्त्री चौकात सकाळी 9 वाजेच्या सुमारास हिंदु समाज जमण्यास सुरुवात झाली. बघता बघता हजारोच्या संख्येने हिंदु तरुण तरुणी मोर्चात सहभागी झाले, मोर्चा निघाला.जोर्वे गावातील तरुणांना संगमनेर शहरातील जोर्वेनाका येथे मारहाण झाली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाने आज दि.६ रोजी संगमनेर शहरातून भगवा मोर्चा काढला.

या मोर्चात संगमनेर शहरातील हजारो नागरिकांसह आसपासच्या ग्रामीण भागातील गावकरीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.नागरिकांच्या हातात असलेले वेगवेगळे फलक हिंदू समाजाचा आक्रोश दर्शविण्यासाठी पुरेसे होते. तर तरुणांकडून दिल्या जाणाऱ्या घोषणांनी अवघे संगमनेर दुमदुमून गेले होते. नगरपालिकेपासून निघालेला हा मोर्चा बाजारपेठ, सय्यदबाबा चौक, मेनरोड, चावडी, मोमीनपुरा मार्गे प्रशासकीय भवनाजवळ पोहोचला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे