कविता म्हणजे आपल्या मनाचे अंतरंग:कवी शिवाजी चाळक

1 min read

बेल्हे दि.६ :- काव्यप्रेमी शिक्षक मंच महाराष्ट्र राज्य व समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स, बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित काव्यप्रेमी शिक्षक मंच राज्यस्तरीय पदाधिकारी साहित्य संमेलन नुकतेच समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे मोठ्या दिमाखात पार पडले.
या साहित्य संमेलनाचे उदघाटन समर्थ शैक्षणिक संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन आणि प्रतिमापूजन करून करण्यात आले.
हे राज्यस्तरीय साहित्य संमेलन काव्यप्रेमी शिक्षक मंच चे राज्यध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली व जेष्ठ साहित्यिक शिवाजीराव चाळक आणि काव्यप्रेमी शिक्षक मंच चे राज्यसचिव कालिदास चावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
उपस्थित कवी आणि साहित्यिकांशी चर्चात्मक संवाद साधताना जेष्ठ साहित्यिक आणि कवी शिवाजीराव चाळक म्हणाले कि कविता म्हणजे आपल्या मनाचे अंतरंग आणि कविता ही अंतरंगातून आली पाहिजे.आतून आलेली कविता रसिक प्रेक्षकांना मनमुराद आनंद मिळवून देते.

काव्यप्रेमी शिक्षक मंच च्या माध्यमातून रसिकवर्गाचे निखळ मनोरंजन होत असल्याचे संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सांगितले. यावेळी चारुदत्त मेहरे, विशाल अंधारे,सिमा भांदर्गे, बबन धुमाळ, नवनाथ गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

विविध जिल्ह्यातून ५० जिल्हाध्यक्ष कवी आणि साहित्यिक या संमेलनासाठी उस्फुर्तपणे सहभागी झाले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरला साळुंखे यांनी प्रास्ताविक कवी संदिप वाघोले सर यांनी तर आभार रणजित देशमुख यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे