शुभम तारांगण हरितगृह प्रकल्पामध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा
1 min read
आळेफाटा दि.६ :- शुभम तारांगण या हरितगृह प्रकल्पामध्ये जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रकल्पामध्ये झाडे लावून उत्साहात साजरा केला असून वनराई जपण्याचं काम शुभम तारांगण करत आहे. शुभम डेव्हलपर्स नेहमी पर्यावरण पूरक गोष्टींवर भर देत असते यामध्ये सांडपाण्याचे शुद्धीकरण करून ते पुन्हा पुनर्वापरात आणले जाते व ते पाणी सोसायटीतील गार्डनला, फुल झाडांना व 500 पेक्षा अधिक असलेला झाडांना दिले जाते.
कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कंपोस्ट खत प्रकल्प उभारून सोसायटीमध्ये तयार होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते, सौर ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा तयार केले जाते, पाण्याचा पुनर्वापर तसेच पाण्याचे संवर्धन असे अनेक उपक्रम राबवून शुभम परिवार पर्यावरणाला मदत करत आहे. म्हणूनच शुभम तारांगण हा हरितगृह प्रकल्प आहे. आपण देखील अशा पर्यावरण पूरक गोष्टींवर भर देऊन पर्यावरणाला मदत केली पाहिजे.