महिलांच्या भेटीला जागतिक महिला बँकेच्या महिला प्रतिनिधी ओझरमध्ये
1 min read
ओझर दि.३ :- जुन्नर तालुक्यातील ओतूर, पिंपरी पेंढार प्रभागतील ग्रामपंचायत ओझर नं.२ येथे मा. जिल्हा अभियान सहसंचालक तथा प्रकल्प संचालक शालिनी कडू (जि.प.पुणे) आणि शरदचंद्र माळी (गट विकास अधिकारी, पंचायत समिती जुन्नर) यांचे मार्गदर्शनाखाली जागतिक महिला बँकेच्या प्रतिनिधी यांनी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्थापन ओझर नं.२ येथील राजमाता जिजाऊ महिला ग्रामसंघाच्या सर्व महिलांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि उमेद अभियान कामाबाबत चर्चा केली.
या जागतिक महिला बँकेच्या टीममध्ये मॉली मॅडम (अमेरिका प्रतिनिधी) नूर मॅडम (बांग्लादेश प्रतिनिधी), नारायण सर (जागतिक महिला बँक समन्वयक, MSRLM), सोनाली अवचट ( जिल्हा व्यवस्थापक, आर्थिक समावेशन) यांचा समावेश होता.
या क्षेत्र भेटी दरम्यान प्रथमता ओझर-२ येथे जागतिक महिला बँकेच्या टीमचे आगमन झाल्यानंतर उपस्थित महिलानी लेझिम नृत्य करत पाहुण्यांचे भारतीय महाराष्ट्रियन पद्धतीने औक्षण करत स्वागत केले, त्यानंतर गावातील सार्वजनिक सभागृह येथे उपस्थित महिलांशी संवाद साधला आणि ग्राम संघ कार्यपद्धती व भूमिका, बँक कर्ज आणि परतफेड, सामाजिक समावेशन ग्राम संघाचे विविध निधी याबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी या कार्यक्रमासाठी तालुका अभियान व्यवस्थापक उमेद उषा अभंग, प्रभाग समन्वयक रविंद्र आल्हाट, प्रभाग समन्वयक निर्मला गाढवे ओझर.२ गावच्या सरपंच तारामती कर्डक, तंटामुक्तीचे अध्यक्ष दिलीप कवडे, उपस्थित होते. यावेळी सोनाली मॅडम, अभंग मॅडम, सरपंच कर्डक यांनी उपस्थित महिलाना मार्गदर्शन केले. यावेळी राजमाता जिजाऊ महिला ग्राम संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपाली कवडे, अहवाल वाचन नालिनी कवडे, कांचन कवडे आभार CRP मनिषाताई जगताप यांनी मानले, यानंतर बँक ऑफ बडोदा, शाखा ओझर येथे शाखा व्यवस्थापक जोंधळे यांची भेट घेऊन या टीमने उमेद अभियान मधील समूह यांनी केलेले एकूण अर्थसहाय्य व त्यामार्फत केलेले उपजीविका उपक्रम यांची पाहणी केली.
यावेळी भाग्यलक्ष्मी समूहा मार्फत सुरू केलेल्या पुण्यश्री किराणा दुकानास भेट देण्यात आली, तसेच या टीमने श्री विघ्नहर देवस्थान गणपतीचे दर्शन घेतले यावेळी देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे, विश्वस्त मंगेश मांडे. आणि विश्वस्त राजश्री कवडे यांनी या टीमचे स्वागत केले व टीमकडून देवस्थानच्या सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले.
या ओझर गावातील उमेद अभियानाचे काम पाहून आणि उपजीविका उपक्रमास भेट देऊन जागतिक महिला बँकेच्या या प्रतिनिधी यांनी समाधान व्यक्त केले व ग्राम संघाच्या पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या.