कर्करोगाला घाबरून नका; कर्करोगावर मात करता येते:- डॉ. प्रदिप जोशी

1 min read

खोडद दि.१८:- कर्करोग या आजाराला घाबरून न जाता वैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शन घेऊन योग्य वेळी शारीरीक तपासणी केल्या तर उपचाराच्या साह्याने या आजारावर मात करता येते असे प्रतिपादन डॉ प्रदिप जोशी यांनी व्यक्त केले. मांजरवाडी (ता. जुन्नर) येथे जनकल्याण फांऊंडेशन मांजरवाडी यांचे वतीने अशोक मुळे यांचे स्मरणार्थ डॉ प्रदिप जोशी व रोटरी क्लब नारायणगाव हायवे यांचे संयुक्त विद्यमाने दि.14 रोजी श्री स्वामी समर्थ कॉंप्लेस्क्स जनकल्याण सभागृह येथे आयोजित मोफत कॅन्सर, पोट, ह्रदय, शुगर, बीपी तपासणी शिबीर आयोजित केले होते. यावेळी डॉ जोशी शिबिरास उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन करताना बोलत होते. या वेळी रोटरी क्लब हायवे अध्यक्ष डॉ उत्तम घोरपडे यांनी मानवी शरीरात वाढते आजार याला आपला आहार तसेच व्यसन देखील जबाबदार असल्याचे सांगितले. या शिबिरात एकुण 234 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 114 रुग्णांची कॅन्सर मार्कर तपासणी रोटरी क्लबच्या माध्यमातून करण्यात आली  सर्जन डॉ प्रदिप जोशी यांचे माध्यमातून 16 रुग्णांचा ईसीजी तपासणी, 125 रुग्णांची शुगर व बीपी तपासणी करण्यात आली तर 120 रुग्णांची पोट, सांधे दुखी, अशक्तपणा, शरीरावर असणाऱ्या गाठी यांची तपासणी करण्यात आली. व जनकल्याण  फाऊंडेशन,पतसंस्था, दूधसंस्था, वाचनालय, शेतकरी संस्था,केपीएल ग्रुप यांचे मार्फत  गोळ्या व औषध वाटप करण्यात आले. या शिबिराचे उदघाटन जेष्ठ व्यक्ती बबन दगडू मुळे यांची तपासणी करून करण्यात आले. या शिबिरास जनकल्याण पतसंस्था, दूधसंस्था, वाचनालय, शेतकरी संस्था यांचे सहकार्य लाभले. यावेळी संस्थापक  मंगेश मुळे,मा सरपंच मनीषा मुळे, अध्यक्ष मोहन मुळे, राजेंद्र मुळे, बाळासाहेब मुळे, संदिप मुळे, सुरेश मुळे, उपाध्यक्ष  जिजाभाऊ खंडागळे, राहुल शिंदे,पोपट मुळे, शिवाजी चोपडा, बाबाजी मुळे,अक्षय मुळे,शितल मुळे, डॉ. हेमलता गुळे, डॉ. नंदिनी घाडगे, सुखाची मुळे, नंदकुमार चिंचकर, धनंजय बोरकर, मुरलीधर भोर, विलास खंडागळे, मयुर शिंदे,भगवान गावडे, विलास म्हस्क,विजय मुळे,किसन थोरात,संजय मुळे, दीपक कांबळे आदी पदाधिकारी व ग्रामस्थ व लॅब कर्मचारी, नर्स,डॉ सहकारी  उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!