विद्यानिकेतन संकुलात दहीहंडी निमित्त अवतरले बाल राधाकृष्ण

1 min read

साकोरी दि.१७:- विद्यानिकेतन संकुलात गोपाळकाला उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी च्या प्राचार्या रुपाली पवार – भालेराव यांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करण्यात आले. गोविंदा आला रे आला ,राधे कृष्ण गोपाळ कृष्ण, गोविंदा रे गोपाला, कृष्ण वंदे जगद्गुरु अशा घोषणा देऊन गोपाळकाला कार्यक्रमास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी कृष्ण व राधेच्या वेशभूषेत दहीहंडी भोवती रिंगण करीत आनंद लुटला. लहानसा मनोरा करून बाल श्रीकृष्णाने दहीहंडी फोडली. इयत्ता ज्युनियर के.जी ते इयत्ता १२ वी पर्यंत चे सर्व विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता सोनवणे यांनी केले सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रतिभा गाडगे आणि कल्याणी पवार, रोहिणी कदम यांनी विद्यार्थ्यांना बालकृष्णाची गोष्ट सांगितली व त्यानंतर लाह्या व फळे या प्रसादाचे वाटप करण्यात आले . भगवान श्रीकृष्णाच्या गोड गाण्यांच्या तालावर लहान मुलांनी नाचून आनंद लुटला व या सर्व गोड आठवणी घेऊन लहान चिमुकले आपल्या घरी परतली या कार्यकमासाठी विद्यानिकेतन संकुलनाचे संस्थापक पांडुरंग साळवे, पी.एम हायस्कुल आणि ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य रमेश शेवाळे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!