पुना ब्लड बॅंक व राजुरी ग्रामपंचायत आयोजित शिबिरात २६६ जणांनी केले रक्तदान
1 min read
राजुरी दि.१७:-पुना ब्लड बॅंक व ग्रामपंचायत राजुरी यांच्या संयुक्त विद्यमाने 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राजुरी येथे रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल 266 जणांनी स्वच्छेने रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जपली. गावातील तरूणांसह जेष्ठ नागरीक व महिलांनी सहभाग नोंदवला.
रक्तदान हे महादान असल्याचे सांगत आयोजकांनी गावकयांचे कौतुक केले. एवढ्या मोठ्या संख्येने झालेले रक्तदान हे राजुरीकरांच्या सामाजिक जाणिवेचे प्रतिक ठरले आहे. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी पुना ब्लड बॅंक चे गणेश औटी, सामाजिक कार्यकर्ते रविराज गाडगे, ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रम प्रसंगी ग्रामनेते दिपक आवटे, सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माउली शेळके, ग्रामपंचायत सदस्य, एम डी घंगाळे, एकनाथ शिंदे, चंद्रकांत जाधव, शाकिर चौगुले, गौरव घंगाळे, सखाराम गाडेकर, रंगनाथ औटी, बाळासाहेब औटी, कैलास औटी, विनोद औटी, डी.बी.गटकळ,राजेंद्र औटी, राजाराम हाडवळे, दिलीप घंगाळे, सुभाष औटी,
जी.के.औटी. अशोक औटी, मुबारक तांबोळी, जिलानी पटेल, रईस चौगुले, गोरक्ष हाडवळे, राजेंद्र हाडवळे, विक्रम डूंबरे व मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ, पत्रकार मित्र, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जी. के. औटी यांनी केले तर आभार सरपंच प्रिया हाडवळे यांनी व्यक्त केले.
