महाराष्ट्रावर ११ लाख कोटींचे कर्ज:-राज ठाकरे
1 min read
मुंबई दि.२०:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढी पाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर जोरदार भाषण केले. यावेळी राज ठाकरे यांनी मनसेच्या स्थापनेची 20 वर्ष, अमेरिका इस्त्रायल आणि इराण युद्ध, गॅस संकट, शेतीचा प्रश्न, राज्यातील कायदा व सुव्यवस्था यासह इतर मुद्यांवर भाष्य केलं.
शिवाय जमलेल्या बांधवांना आणि भगिनींना इन्स्टाग्रामधून बाहेर पडा असं आवाहन केलं.राज ठाकरे यांनी भाषणात राज्याचा विकास, नोकरी, वाहतूक कोंडी यावर सरकारला घेरलं. तसेच त्यांनी इराण-इस्रायल युद्धावर भाष्य करताना केंद्र सरकारलाही घेरलं.
सरकारने इराणला पाठिंबा न देण्याची मोठी चुक केली आहे. या चुकीचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत, असा मोठं भाकितही त्यांनी व्यक्त केलं. आज शहरांची अवस्था बकाल झाली आहे. शहरांना आकार राहिलेला नाही. कोणीही येतं कुठेही इमारती बांधतं.
कोणालाही कसल्याही इमारती बांधण्याच्या परवानग्या दिल्या जातायत, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.गेल्या काही वर्षांमध्ये राज्यावरील कर्जात मोठी वाढ झाली आहे. 2014 पूर्वी राज्यावर 2 लाख कोटी कर्ज होते,मात्र त्यानंतर आतापर्यंत 11 लाख कोटी कर्ज झाले आहे. असं असलं तरी शहरे कोलमडून पडली आहेत.
पिज्जा 10 मिनिटात येतो, पण सामान्य मानसाला 10 मिनिटात कुठे जाता येत नाही फुटपाथ जाम आहेत, सगळीकडे ट्रॅफिक आहे. ग्रामीण भागातील लोक शहराकडे येऊ इच्छित आहेत, मात्र शहराचे नियोजन नाही. संपूर्ण राज्यात ड्रग्स विकले जात आहेत.
शाळांमध्ये ड्रग्स जातायेत, शाळांमध्ये ड्रग्स जातायेत. तरूणी-तरुणी व्यसनाधीन होत आहेत. काय करणार आहोत आपण महाराष्ट्राचं.ग्रामीण भागात प्रगती होत नाही, ग्रामीण भागातील मुलं-मुली शहरात येत आहेत, शहरं बकाल पडली आहेत. शहरामध्ये ड्रग्स मिळत आहेत, लहान मुली मुलं पळवली जात आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.
मी जे तुम्हाला बोलतोय ते टाळ्यांसाठी बोलत नाहीये, मी जो तुम्हाला शब्द दिलाय तो या महाराष्ट्राचं गतवैभव प्राप्त करण्यासाठी म्हणून आपल्याला जी सत्ता घ्यायचीय ती सत्ता भविष्यात हातात घेणार, हे मी फक्त तुमच्या टाळ्या घेण्यासाठी म्हणून नाही, तो माझा आत्मविश्वास आहे.
महाराष्ट्रात पुढचे तीन वर्ष काही निवडणुका नाहीत, त्यामुळं कंत्राटदारांकडून पैसे खायला सगळेच मोकळे आहेत, अशी टीका राज ठाकरेंनी केली. राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील व्यक्तींची नावे घेतली.
कला, साहित्य, संशोधन, तंत्रज्ञान, इतिहास, राजकारण अशा वेगवेगळ्या क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचे नाव घेत राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे वैभव सांगण्याचा प्रयत्न केला.हे सांगताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले,
अण्णाभाऊ साठे तसेच अशा अनेक महापुरुषांची नावे घेतली. याचवेळी त्यांनी शरद पवार यांच्या नावाचाही उल्लेख केला. शरद पवार यांनी आतापर्यंत अनेक कामं केली आहेत, असे शरद पवार यांचे तोंडभरून कौतुक राज ठाकरे यांनी केले.
