बी.जे.महाविद्यालयातील विद्यार्थी करतायत सायबर जनजागृती

1 min read

आळेफाटा दि.१८:- बी.जे.महाविद्यालय व क्विक हिल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राबवित असलेल्या “सायबर शिक्षा फाॅर सायबर सुरक्षा” या प्रकल्पांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थिनी शुभांगी माळी आणि चौधरी सानिका यांनी सर्व वारकऱ्यांना सायबर सुरक्षा व माहिती तंत्रज्ञान युगात इंटरनेट वापरताना घ्यावयाची काळजी या विषयी माहिती देऊन सायबर जगतात सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक बाबींची ओळख करून दिली.सदर विद्यार्थिनींनी माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलचा वापर व इंटरनेटचा वापर करताना काय काळजी घेतली पाहिजे हे उदाहरणासह समजून सांगितले. या विद्यार्थिनींच्या कामाचे कौतुक केले व विद्यार्थिनींना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. बी.जे. महाविद्यालयातील बीसीएस विभागातील विद्यार्थिनींनी अतिशय उत्कृष्ट संवाद साधत विद्यार्थ्यांच्या शंकांचे देखील याप्रसंगी निरसन केले. त्याचप्रमाणे असे स्तुत्य उपक्रम क्विक हिल फाउंडेशन व बी.जे. महाविद्यालय राबवत आहे. याबद्दल अध्यक्ष दावला बापू खुटाळ आस्थापनांचे देखील वारकऱ्यांनी कौतुक केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!