प्रधानमंत्री आवास योजनेच्या 1348 सदनिकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते लोकार्पण
1 min read
सोलापूर दि.१८:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते सोलापूर येथे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) दहिटणे व शेळगी येथील 1348 सदनिकांचे फित कापून उदघाटन संपन्न झाले.
यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी मॉडेल हाऊसची पाहणी करून कोनशिलेचे अनावरण केले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातील लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण केले. तसेच सोलापूर सोशल फाऊंडेशन तर्फे आयोजित ‘सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सव-2025’ च्या बोधचिन्हाचे अनावरण केले.
पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचा सभापती या नात्याने मुख्यमंत्री व उपस्थित सर्व मान्यवरांचे म्हाडाच्या वतीने स्वागत केले. यावेळी मंत्री जयकुमार गोरे, आमदार विजय देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे व इतर मान्यवर उपस्थित होते.
