आदर्शवत ! वाढदिवसानिमित्त गाव केला स्वच्छ

1 min read

पारगाव दि.२:- पारगाव मंगरूळ (ता. जुन्नर) गावचे ग्रामपंचायत सदस्य उत्तम फापाळे यांनी वाढदिसानिमित्त गावात सर्वत्र स्वच्छ्ता केली.फापाळे यांनी सकाळी पासून गावात संपूर्ण गाव स्वच्छता मोहीम राबवून वाढदिवस साजरा केला. सध्या वाढदिवसाच फ्याड आल असून लोक लाखो रुपये खर्च करतात परंतु काही या वाढदिवसाचा सदुपयोग करून सामाजिक कार्य करणारे महान ठरतात.

आपल्या पैशाचा दुरुपयोग न करता पैसे चांगल्या मार्गाला लावत, समाजकार्याला व सामाजिक आरोग्य सुधारण्यासाठी एक चांगला उपक्रम राबवून समाजापुढे एक आदर्श निर्माण करत फापाळे यांनी वाढदिवस साजरा केला. या उपक्रमात सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी यात सहभाग घेतला.

तसेच उत्तम फापाळे यांना ग्रामस्थांनी वाढदिवसाच्या आरोग्यमय शुभेच्छा दिल्या. गावचे सामाजिक कार्यकर्ते संभाजी चव्हाण यांनी फापाळे यांचे कौतुक केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे