‘गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान’ विम्याची रक्कम 10 लाख रुपये करा:- पांडुरंग पवार
1 min read
निमगाव सावा दि.२:- शेती व्यवसाय करत असताना होणारे अपघात बीज पडणे, सर्पदंश, पुर, विजेचा शॉक लागणे इ. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात इ. कारणांमुळे घरातील कर्त्या व्यक्तिचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना रु.२,००,०००/- (दोन लक्ष रुपये) इतके सानुग्रह अनुदान देण्यात येते.
परंतु सदरची रक्कम फारच तुटपुंजी आहे, तरी सदरची रकमेत वाढ करुन ती रु.१०,००,०००/- (दहा लक्ष रुपये) रुपयां पर्यंत वाढ करणे करण्यात यावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यामध्ये सन २००५-२००६ पासुन शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना सुरु करण्यात आली नंतर दि.९ डिसेंबर 2019 पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना कार्यान्वित होती.पण, या योजनेत विमा कंपनीकडून दावे वेळेत निकाली न काढणं, अनावश्यक त्रुटी काढून विमा नाकारणं या बाबी समोर आल्या होत्या.त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं या योजनेत सुधारणा केली आहे.
त्यानुसार, आता एप्रिल २०२३ पासून राज्यात ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ जाहीर करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांस 2 लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे.हेच २ लाख तुटपुंजे असून ते १० लाख करण्याची मागणी करण्यात आली आहे.