शुभम तारांगण निसर्गरम्य वातावरणातील परिपूर्ण सुखसोयीनी सुसज्ज असा हरित गृहप्रकल्प
1 min read
आळेफाटा दि. १ :-जुन्नर तालुक्याच्या परिसरातील कल्याण-नगर आणि पुणे-नाशिक अशा दोन्ही महामार्गाच्या संगमावर वसलेल आळेफाटा एक प्रमुख व्यावसायिक केंद्र म्हणुन विकसित होत आहे. प्रशस्त रस्ते, नियोजनबध्द विकास, आधुनिक जीवनशैलीसाठी आवश्यक सर्व सुखसुविधा, सार्वजनिक वाहतुकीची उत्तम सोय, नामांकित शिक्षण संस्थांची उच्च शिक्षणाची विविध केंद्रे, शुध्द हवा आणि मुबलक पाणीपुरवठा… ही या वाढत्या शहरीकरणाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पहिला IGBC पुरस्कृत हरित गृहप्रकल्प पाहण्यासाठी आपणास सस्नेह निमंत्रण !
या विकासातील एक महत्वाचा भाग ठरणार आहे ते म्हणजे शुभम डेव्हलपर्स निर्मित ‘शुभम तारांगण हरित गृहप्रकल्प’.
शुभम तारांगण हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील इंडियन ग्रीन बिल्डींग काऊन्सिल यांचेकडून “प्लॅटीनम रेटींग” हा मान मिळविलेला पहिला हरित गृहप्रकल्प आहे.
• प्रोजेक्ट ची मुख्य वैशिष्ट्ये
१. मुबलक पाणी सुविधा
स्वमालकीच्या जागेतील विहीरीपासुन गृहप्रकल्पापर्यंत स्वमालकीची पाईपलाईन. प्रकल्पाअंतर्गत पाच बोअरवेल. पाणी सुविधेसाठी वरील खात्रीशीर व भरीव स्त्रोत उपलब्ध आहे.
२. येथे 500 अधिक झाडे आपल्याला पाहायला मिळतील . गृह प्रकल्पांतर्गत असलेल्या सार्वजनिक जागेत अनेक प्रकारची झाडे,फळझाडे व इतर पर्यावरण पूरक झाडे आहेत.
३. जल शुद्धीकरण प्रकल्प (Water Treatment Plant – WTP) :
एकूण प्रकल्प क्षमता : ३ लाख लिटर / दिवस
शुद्धीकरण करण्यासाठी माध्यम (Filter Media) :
सँड सस्पेंडेड सॉलिड – कचरा गाळण्यासाठी सॉफ्टनर – क्षारांचे प्रमाण कमी करण्यासाठी
ऍक्टिवेटेड चारकोल – रंग आणि दुर्गंधी दूर क्लोरीनेशन – घातक जीवाणू मारण्यासाठी
४. कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प (Organic Waste Composter OWC) : या प्रकल्पाअंतर्गत गृहप्रकल्पातील घनकचरा व्यवस्थापन केले जाते. सर्व सदनिकांमधील ओला कचरा जमा करुन त्यावर प्रक्रिया केली जाते व त्यापासुन कंपोस्ट खत निर्मिती करुन तयार झालेले खत हे गृहप्रकल्पातील
बगीच्यामधील झाडांसाठी वापरले जाते. • प्रकल्प क्षमता 200 Kg/day
• वापर घरगुती ओला कचरा विघटन
• इतर मिश्रण – कंपोस्ट कल्चर, लाकडी भुसा
स्वयंचलित
५. सांडपाणी व्यवस्थापन (Sewage Treatment PlantSTP) :
प्रकल्पाची एकूण क्षमता : २,७०,००० लिटर / दिवस सोसाटीतील सर्व सांडपाणी एकत्र करून त्याच्यावर प्रक्रिया केली जाते व ते वापरण्या योग्य (Treated Water) बनवून पुढे ते पाणी सोसायटील झाडांना, फ्लश टँक व शेतीला वापरले जाते. अश्याप्रकारे पाण्याची रिसायकलींग करणारा जुन्नर तालुक्यातील पहिलाच प्रकल्प आहे.
६. सौर विद्युत (फोटो व्होल्टेइक / पीव्ही सोलर) :
सौर उर्जेपासून विद्युत उर्जा (इलेक्ट्रिसिटी) तयार करून ती गृहप्रकल्पाअंतर्गत असलेल्या सार्वजनिक
जागेसाठी वापरली जाते. प्रकल्प क्षमता 20KW
७. सोलर हिटर (सोलर वॉटर हीटर):
क्षमता : १३५ लिटर / सदनिका याप्रमाणे. सौर उर्जे पासून पाणी तापविले जाते.
८. पावसाचे पाणी पुनर्भरण (Rain Water Harvesting) : पावसाचे जमा झालेले पाणी हे आपण २५० फुट असलेल्या बोअरवेलमध्ये पुनर्भरण करुन पाण्याचे संवर्धन
करतो. अशा एकूण १६ बोअरवेल मार्फत पाण्याचे भरण करुन पाण्याचे संवर्धन केले जाते.