राजुरीत सविता औटी व प्रतिभा आवटे यांना अहिल्यादेवी महिला सन्मान पुरस्कार
1 min read
राजुरी दि.३१:-महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांचेकडून सामाजिक क्षेत्रात उत्कॄष्ट कार्य करणा∙या महिलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कर्तबगार दोन महिलांना हा पुरस्कार देणेबाबत शासन निर्देश होते.त्यानुसार राजुरी ग्रामपंचायतीने अंगणवाडी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा•या सविता औटी यांना व महिला बचत गटांसाठी कार्य करणा∙या प्रतिभा आवटे यांना हा पुरस्कार गावातील प्रमुख्य मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला.
राजुरी गावातील सुकन्या आर्या हाडवळे हिचा 12 वी परीक्षेत जुन्नर आंबेगाव तालुक्यात विज्ञान, वाणिज्य व कला या तिन्हीही शाखेतुन प्रथम क्रमांक आल्याबद्धल मॄणाल हाडवळे व आकांक्षा औटी यांची मुंबई पोलीस दलात निवड झालेबद्द्ल तसेच शिवाई महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षपदी संगिता शेळके यांची निवड झालेबद्दल या कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी ग्रामनेते दिपक आवटे, सरपंच प्रिया हाडवळे , उपसरपंच माऊली शेळके, माजी सरपंच व विद्यमान सदस्य एम डी घंगाळे, ग्रामपंचायत सदस्य सखाराम गाडेकर,रंगनाथ औटी , शाकिर चौगुले, शितल हाडवळे , रुपाली औटी , सोसायटीचे चेअरमन कारभारी औटी , ज्ञानदिप पतसंस्थेचे चेअरमन गोरक्ष हाडवळे , गणेश दुध संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब हाडवळे , युवा नेते वल्लभ शेळके सर , संदिप औटी , सुरेश औटी , निलेश हाडवळे , रमेश औटी , रामचंद्र हाडवळे , अरविंद आवटे , गणेश हाडवळे , संगिता शेळके , अंगणवाडी कार्यकर्ती , मदतनीस, आशा वर्कर व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.